इकडे मनोज जरांगेंची आरपार लढाईची घोषणा, तिकडे मराठा आरक्षणावर भाजपचे सूचक ट्वीट
मनोज जरांगेंच्या आक्रमक भाषणांनंतर महाराष्ट्र भाजपाकडून लगेच आलेल्या या ट्वीटची चांगलीच रंगली आहे.
मुंबई : आज जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) उपोषकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची सभा झाली. सभेला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाने गर्दी केली होती. या विराट सभेतून मनोज जरांगेंनी सरकारला शेवटचं दहा दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. तसेच मराठा समाजाला उसकवा असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि सदावर्तेंना सांगितल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे. मनोज जरांगेंच्या या आक्रमक भाषणानंतर भापने देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत सूचक वक्तव्य केले आहे.
मराठ्यांची मागणी योग्य आहे. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी मराठ्यांना आरक्षण दिले होते. ते हायकोर्टाने वैध देखील ठरवले परंतु सुप्रीम कोर्टात ते शरद पवार,उध्दव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारच्या काळात मराठा टिकू शकले नाही,पण भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबध्द असल्याचे ट्वीट भाजप महाराष्ट्रकडू करण्यात आले आहे. मनोज जरांगेंच्या आक्रमक भाषणांनंतर महाराष्ट्र भाजपाकडून लगेच आलेल्या या ट्वीटची चांगलीच रंगली आहे.
मनोज जरांगेने सध्या मराठा आरक्षणासाठी रान उठलले आहे. मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.मराठा आरक्षणामुळे ओबीसीआणि मराठा समाज आमने सामने आला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर उभा राहिल्याने भाजपच्या पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी घालून दिलेली मर्यादा ओलांडण्यासाठी घटनादुरूस्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी पाहायला मिळत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबध्द!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 14, 2023
- उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी#devendrafadnavisformaharashtra #MarathaArakshan #मराठाआरक्षण pic.twitter.com/qQF3A2fRDf
सरकारला दिलेल्या 40 दिवसांपैकी 10 दिवस उरले असून या दहा दिवसांत आरक्षण द्या अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची.. असा इशारा जरांगेंनी दिला...शिवाय 22 ऑक्टोबरला पुढची दिशा ठरेल असंही जरांगे म्हणाले... या विराट सभेसमोर जरांगेंनी छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय..., मराठा समाजाला उसकवा असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि सदावर्देंना सांगितल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय... शिवाय सरकारनं आपलं फेसबुक अकांऊटही बंद केल्याचा आरोप जरांगेंनी केला..
हे ही वाचा :