'मी देखील आता सर्व उघड करतो', SIT चौकशीवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
Manoj Jarange SIT Inquiry : मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Manoj Jarange SIT Inquiry : मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात देखील गाजताना पाहायला मिळत असून, आशिष शेलार यांच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच चुकीचं नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. आता म्हणाले तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे म्हणाले आहेत.
मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही : फडणवीस
दरम्यान एसआयटी चौकशीबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, “ मला बोलायचं नव्हतं. मराठा सामाजच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे. मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टीकवलं. सारथीला निधी दिला, शिष्यवृत्ती दिली. कर्ज दिले आहे. मराठा सामाज्यातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले आणि त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभे राहिले आहे. मराठा समजा जरांगे यांच्या पाठीशी उभं राहिले नसल्याचे फडणवीस म्हणाले.
विधानपरिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक...
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे पडसाद विधानसभाप्रमाणे विधानपरिषदेत देखील उमटले. याच मुद्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलताना दरेकर म्हणाले की, “राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे. हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढून याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटीमार्फत चौकशी करावी. उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. तसेच जरांगे यांच्या सभांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कुठून करण्यात आला, त्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील दरेकर यांनी यावेळी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :