एक्स्प्लोर

Maharashtra Winter Assembly Session LIVE Updates : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

Maharashtra Winter Assembly Session : आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस. पेपरफुटी, नोकरभरतीवरुन सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती, तर विरोधकांचे आरोप परतवण्यासाठी सरकारची तयारी.

Key Events
Maharashtra Winter Assembly Session LIVE Updates winter session of Legislature begins today at Mumbai Maharashtra Winter Assembly Session LIVE Updates : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह
Maharashtra Winter Assembly Session

Background

Winter Assembly Session Maharashtra : हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आणि आज ठाकरे सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती तयार आहे. नोकरभरती, वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षेत झालेले घोळ यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची विरोधकांची रणनिती असणार आहे. काल भाजप आमदारांची आयोजित केलेल्या भोजनावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाजप आमदारांना मार्गदर्शन केल्याचं कळतंय. दरम्यान परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे गेल्या सरकारशी जोडले गेले आहेत हे पुराव्यानिशी सादर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळं आज परीक्षा घोटाळ्यांवरुन सरकारची परीक्षा असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आघाडीला घेरण्याची भाजपची रणनीती काल डिनर टेबलवर शिजली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर काल रात्री भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमात सरकारला कसं घेरायचं याबाबत फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शन केलं. नोकरभरती पेपरफुटी घोटाळ्यावरून सरकारला घेरण्याची तयारी भाजपनं केली आहे. 

हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसर्‍या दिवशीही विरोधक आक्रमक राहण्याची दाट शक्यता आहे. विशेषता नोकर भरती मध्ये झालेला घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक राहतील. मात्र त्याच वेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा आक्रमक होतील आणि याची कुठेतरी धागेदोरे मागील सरकारच्या काळांमध्ये आहे, त्याचे पुरावे देण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे विज बिल संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी राखून ठेवायला सांगितलं त्यात नाना पटोले यांनी या सुरात सूर मिसळून ही राखून ठेवण्याची मागणी केली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा विज बिल संदर्भांमध्ये विरोधक आक्रमक होतील आणि त्याच वेळी अजित पवार यांनी उत्तर द्यावे अशा प्रकारची मागणी होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर यांच्याबद्दल अशिष शेलार यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य यावर ही शिवसेना आमदार आक्रमक होईल. 

विधानसभेत मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विषयी भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेले वक्तव्य यावरून कारवाई मागणी करणारी लक्षवेधी सूचना सेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी टाकली आहे. तर भाजप आमदार अमित साटम यांनी कोविड काळात मिरा-भाईंदर, भंडारा येथे रूग्णालयाला आग लागून मृत्यू झाल्याच्या घडल्या याची लक्षवेधी विशेष आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आज सभागृहात भरती घोटाळा संदर्भात मोठा खुलासा करणार असल्याची माहिती आहे. लोकलेखा समितीचा अहवाल ही आज मांडला जाणार आहे. 

विधानसभा अध्यक्ष निवडणूक पद्धत आवाजी मतदानाने करण्याच्या संदर्भात सूचना हरकती नेमक्या काय घेतल्या जातात याकडे लक्ष असून सादर केलेल्या पुरवण्या मागणी यावर ही आज चर्चा होइल. आज अनेक विधेयकं सभागृहात मांडली जाण्याची शक्यता आहे. तसेच काल भास्कर जाधव यांनी केलेली मोदींची नक्कल आणि त्यानंतर भाजपची आक्रमकता यांमुळे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस विशेष गाजला. अशातच आज पुन्हा विरोधक-सत्ताधारी एकमेकांसमोर येणार आहे. त्यामुळे आज सभागृहात काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

10:42 AM (IST)  •  28 Dec 2021

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. वर्षा गायकवाड या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या. 

17:51 PM (IST)  •  27 Dec 2021

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात आढळला पहिला ओमायक्रॉन बाधित रग्ण

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात पहिला ओमायक्रॉन बाधित रग्ण आढळला आहे. कतार येथून तो भिवंडी शहरातील गैबिनगर परिसरात आला होता. त्याची आरटीपीसीआर तपासणी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget