Maharashtra School : राज्यातील शाळा एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ सुरु राहणार, उन्हाळी सुट्टी रद्द
Maharashtra School : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण आयुक्तांनी घेतला आहे.
मुंबई : कोरोनामुळे (Coronavirus) शालेय विद्यार्थ्यांच झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या (Summer Holiday) रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू (School Reopen) झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक देखील मागणी करत होते. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांच शालेय नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे.
पहिली ते बारावी अभ्यासक्रमात पंचवीस टक्के कपात
ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.
राज्यातील सर्व शाळा जानेवारीपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता मुंबईतील शाळा (Mumbai School) देखील 24 जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. कोविड एसओपीचे पालन करत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर केला होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI