एक्स्प्लोर

मुंबई, पुण्यासह राज्याला परतीच्या पावसानं झोडपलं, शहरातील रस्ते पाण्यात, गावखेड्यात नदी-नाले तुडुंब

Maharashtra rain : मुंबई आणि पुण्यात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर गाव खेड्यातही मुसळधार पाऊस कोसळला आहे. नदी आणि नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह राज्यभर परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील महत्वाच्या शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबई आणि पुण्यात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर गाव खेड्यातही मुसळधार पाऊस कोसळला आहे. नदी आणि नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक महत्वाची धरणं जवळपास भरली आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 

मुंबई-पुण्यात कोसळधारा : 
मुंबईला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. सायंकाळी तासभर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. मुखतः मुंबईच्या अंधेरी, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, कुर्ला इत्यादी परिसरात जोरदार पाऊस कोसळला.  यामुळे मुंबई चे दृश्यमान कमी झाले आहे. तर काही भागात पाणी भरण्यास ही सुरुवात झाली आहे. दुसरीकडे पुणे शहरातही मुसळधार पाऊस पडला. पुण्यातील कोथरुड, स्वारगेट, हडपसर, शिवाजीनगर या भागात पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झालं होतं. पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर भागात देखील पावसाची संततधार सुरू आहे.. 

परतीच्या पावसामुळे एकाचा मृत्यू -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार परतीचा पाऊस कोसळत आहे. कणकवली साळीस्ते येथील घरावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत पांडुरंग नारायण गुरव यांचा मृत्यू झाला आहे. तहसीलदार आर. जे. पवार, मंडळ अधिकारी संतोष नागावकर तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. गडगडाटासह झालेल्या या पावसात साळीस्ते माळपट्टी भागात असलेल्या गुरव यांच्या घरावरच विजेचा लोळ कोसळल्याची माहिती आहे. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

दिवे घाटात ढगफुटी सदृश पाऊस
राज्यभर परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.. पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर भागात देखील पावसाची संततधार सुरू आहे..पुरंदर तालुक्यातील पुणे- पंढरपूर रस्त्यावरील दिवेघाटात तर ढगफुटी सदृश पाऊस झालाय. घाटातील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं आहे. मस्तानी तलाव ओसंडून वाहत आहे. 

परतीच्या पावसाची तुफान बॅटिंग -
पुण्याच्या मावळमध्ये परतीच्या पावसाने तुफान बॅटिंग केलीय, अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली, जुना पुणे- मुंबई महामार्गावर पावसामुळे काही अंतरावरील वाहन दिसत नव्हती, आज दुपारी अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली, पुण्याच्या मावळ, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.

नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेले अधिकारी आणि आमदार नदीला पाणी आले म्हणून अडकले -
बीडमधील आष्टी परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला होता. या परिसरातील चार हजार कोंबड्या पावसामध्ये वाहून गेल्या. तसेच याच पावसामुळे बाधित झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी आष्टीचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे तसेच उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे आणि तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्यासह कर्मचारी हे आष्टी जामगाव रोडवर असलेल्या सोलवाडी गावाजवळ पोहोचले. मात्र सोलवाडी मध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि सोलवाडी जवळून वाहणाऱ्या नदीला पाणी आले.. पाणी कमी होण्याची वाट आमदार आणि अधिकाऱ्यांनी बघितली खरे मात्र पाऊस वाढत होता म्हणून अखेर याच पाण्यातून ट्रॅक्टर चालवत बाळासाहेब आजबे यांनी स्वतः सोबत अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सोलवाडीच्या शिवारातून बाहेर काढले.

परभणी शहरातील विविध भाग पाण्याखाली - 
परभणी शहरासह जिल्ह्यात आज परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने इथली वाहतूक एकेरी पद्धतीने सुरु करण्यात आली तर गांधी पार्क,कडबी मंडी,नांदखेडा रोड,शनी मंदिर परिसरात पाणीच पाणी झाले आहे. अनेक वाहन धारकांना या पाण्यातून मार्ग काढताना नाकी नऊ आले असुन जिल्हाभरात सोयाबिन आणि कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. 

300 ते 350 लोकांना गावकऱ्यांनी सुरक्षित स्थळी आणलं - 
परभणी तालुक्यातील धर्मापुरी गावच्या शिवारात शेतात कामासाठी गेलेले गावातील तीनशे ते साडेतीनशे जण आज दुपारी झालेल्या पावसामुळे ओढायला पाणी आल्याने अडकले होते. या सर्व लोकांना गावकऱ्यांनी ओढ्याच्या पाण्यातून दोरी लावत अथक परिश्रमातून बाहेर काढले. पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी सोयाबीन काढणी साठी मोठ्या प्रमाणावर शेतात जमा होत आहेत आणि याच अनुषंगाने आजही धर्मापुरीच्या शेत शिवारामध्ये गावातील अनेक महिला मुलं मुली गावकरी गेलेले असताना दुपारी झालेल्या पावसामुळे गावाच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आणि यामुळे या सर्व लोकांना अडकून बसावे लागले होते. मात्र गावकऱ्यांनी तात्काळ या सर्व लोकांच्या मदतीला येत ओढ्यातून दोन्हीच बाजूने दोरी टाकत या सर्व लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.

परळी तालुक्यात पावसाचा हाहाकार.. ओढ्यात पिकअप वाहून गेली -
परळी परिसरात परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सिरसाळ्याजवळ पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्यात पिकअप वाहून गेल्याची घटना घडली. यात दोघे बाहेर पडले तर एकजण अडकल्याची माहिती आहे. पावसामुळे परिसरातल्या हातात आलेले पीकही गेल्याचे पहायला मिळत आहे. सलग पडत असलेल्या पावसामुळे ओढे,नदी नाल्या,दुथडी भरून वाहत आहेत. सिरसाळा मोहा अंबाजोगाई रस्त्यांवरील कांन्नापूर येथील गव्हाडा वड्यावर पाण्याने रुद्र रुप धारण केले असून या ओढ्यात एक चारचाकी पीकअप वाहून गेले.यात तीन प्रवासी अडकले होते त्यापैकी दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.तर अन्य एक जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. वाहून गेलेला पिकअपला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे.रईस अन्सरभाई अत्तार वय 35 असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे.

मांजरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक.. -
लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या धनेगाव येथील मांजरा धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या धरणामध्ये 90.41 टक्के एवढा पाणीसाठा झाला असून 122.91 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याची आवक धरणामध्ये होत आहे. त्यामुळे धरण भरण्याच्या स्थितीत असून कुठल्याही क्षणी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो म्हणून धरण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

अर्ध्या तासाच्या पावसात वाहतूक मंदावली
कल्याण नगर मार्गावरील म्हारळ कांबा दरम्यान रस्त्यावर  पुन्हा पाणी साचले त्यामुळे वाहतूक मंदावली होती. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांना या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. म्हारळ ते पाचवा मैल पर्यंत या चार किलमीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरनाचे काम सुरू आहे मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आलेल्या या कामाचा फटका वाहतुकीला बसतोय. जोरदार पावसात तर म्हारळ कांबा दरम्यान गुडघाभर पाणी साचत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस -
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसाचं पाणी आठवडी बाजारात शिरलं. त्यामुळे बाजारात आलेल्या सर्वसामान्यासोबत व्यापाऱ्यांनाचीही धावपळ झाली. 

उस्मनाबादला पावसाने झोडपले -
भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने दुधना नदीला मोठा महापुर आला होता. यामुळे ईट- पाथरूड रस्त्यावरील या पुलावरील वाहतूक सुमारे एक तासभर ठप्प होती. मात्र या दरम्यान या पाण्यातून जाण्याचे धाडस करून एक व्यक्ती जात असताना गाडी सहित पुलात वाहून जाता जाता थोडक्यात वाचला. गाडी वाहून गेली परंतु व्यक्ती मात्र सुदैवाने वाचला. उस्मानाबाद जिल्ह्यालाही परतीच्या पावसाने झोडपलं.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश -
1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर परतीच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. पंचनामे यांचा अहवाल आल्यानंतर या शेतकऱ्यांना देखील मदत केली जाईल. वेळ प्रसंगी केंद्राची मदत घेऊ ,शेतकऱ्यांनी घाबरू नये परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानांची सरकार भरपाई करून देईल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Embed widget