Maharashtra Monsoon : 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार, हवामान विभागाची माहिती
5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं (Meteorological Department) दिली आहे.
Maharashtra Monsoon : मान्सूनच्या (Monsoon) बाबतीत हवामान विभागानं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं (Meteorological Department) दिली आहे. दरम्यान, 26 सप्टेंबरपासून (सोमवार) महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. परतीच्या प्रवासात उत्तर मान्सून सक्रिय झाला आहे.
राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. तसेच या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे.
धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ
आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळं नदी (Raiver) आणि धरणांच्या (Dam) पाणी पातळीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. यावर्षी राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा काही ठिकाणी फटका देखील बसला आहे. आत्तापर्यंत राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून 85 टक्के पाणीसाठा झाला. मागील वर्षी याच काळात पाणी प्रकल्पाचा पाणी साठा हा 67 टक्क्यांवर होता. त्यामानानं यावर्षी पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. अमरावती विभागातील धरणांमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठी 84 टक्क्यांवर गेला आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये आत्तापर्यंत 76 टक्के पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये 85 टक्के पाणीसाठी, तर नाशिक विभागातील धरणांमध्ये 83 टक्के पाणीसाठी झाला आहे. तसेच पुणे विभागातील धरणांमध्ये 88 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, राज्यात अद्यापही पाऊस सुरु आहे. या सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: