एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : मोठी बातमी ! विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Maharashtra Political Crisis : आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

Maharashtra Political Crisis : विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत (Maharashtra Assembly Speaker on MLAs disqualification) कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश दिले आहेत. या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करण्यासाठी काही अवधी लागणार असल्याचेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले. 

मागील महिन्यात झालेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टने विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत 12 जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले होते. आज, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रकरण सुप्रीम कोर्टात ठेवलं. सिब्बल म्हणाले की, उद्या अपात्रतेबाबतचा विषय विधानसभेत ऐकला जाईल. जर कोर्टानं आज सुनावणी घेतली नाही तर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेऊ शकतात. जोवर यावर कोर्ट सुनावणी करत नाही तोवर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी कोर्टाकडे केली. यावर कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कुठलाही निर्णय न घेण्याबाबत निर्देश दिले. 

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले की, या प्रकरणाची सुनावणी उद्या होऊ शकत नाही. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी करण्यास वेळ लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. मात्र, त्याआधी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले होते. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्यावतीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.

सुप्रीम कोर्टात कोणत्या याचिका?

> १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचं आव्हान

> एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान

> विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका

> विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या आदेशालाही शिवसेनेकडून आव्हान

> एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान

> एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन न्यूज हेडलाईन्स 11 PM टॉप हेडलाईन्स 11 PM 21ऑगस्ट 2024Ambernath Accident : अंबरनाथमध्ये ठरवून कारनं धडक देण्यामागचं कारण समोरNashik Crime Special Report : शिक्षकी पेशाला काळीमा, शिक्षकेनं विद्यार्थ्यांना दिली हत्येची सुपारीBadlapur Politics Special Report:बदलापुरात उद्रेक राज्यभर आंदोलनं,तर दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
Embed widget