एक्स्प्लोर

CM Eknath Shine on Ajit Pawar : अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

CM Eknath Shine on Ajit Pawar : अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. हे ट्रिपल इंजिन सरकार असेल," अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

CM Eknath Shine on Ajit Pawar : "अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. हे ट्रिपल इंजिन सरकार असेल," अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. विधानसभेचे सदस्य अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण होणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला राष्ट्रवादी फोडण्यात यश आलं असलं, तरी आता शिंदे गटाचं काय स्थान असणार याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेष करुन उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. निधी वाटपामध्ये त्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर सातत्याने राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला होता. मात्र, आता अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत आल्याने शिंदे गटाची आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण तर होणार नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. 

अजितदादांनी विकासाला साथ दिलीय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजच्या शपथविधीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "मी अजित पवार आणि इतर आमदारांचं स्वागत करतो. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल. हे ट्रिपल इंजिन सरकार असेल. राज्याचा विकास अतिशय वेगाने होईल. अजितदादांनी विकासाला साथ दिली आहे.

कोणी शपथ घेतली?

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

संभाव्य खाते वाटप

अजित पवार : जलसंपदा
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील : ऊर्जा
हसन मुश्रीफ : कौशल्य विकास
धनंजय मुंडे : गृहनिर्माण
आदिती तटकरे : महिला व बालकल्याण
संजय बनसोडे : पर्यटन
अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर
पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर
पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अपडेट समोर
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
Embed widget