Jitendra Awhad : सुधांशू त्रिवेदींनी शिवाजी महाराजांची 'ती' पाच पत्रे दाखवावी, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल
Jitendra Awhad On BJP : जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये मोठे षडयंत्र आहे.
Jitendra Awhad On BJP : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) , यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापल्याचं दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी(Sudhanshu Trivedi) यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. यावर माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे,
सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?
एका खासगी वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय. ते म्हणाले, 'औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली', असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
''मोठे षडयंत्र, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न''
जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, यामध्ये मोठे षडयंत्र आहे. याच बदलातून आणि वर्णभेदातून हर हर महादेव नवीन चित्रपट आणला होता. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेले काही वर्षे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व विशिष्ट पद्धतीने वेगळे दाखवले आहे. या घटनेला कोणता ऐतिहासिक संदर्भ नाही. इतिहासात अनेक माणसाने शूर कार्य केले आहे, त्यांना योग्य पद्धतीने दाखवावे
''सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांची पाच पत्रे दाखवावी''
आव्हाड पुढे म्हणाले, सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांची पाच पत्रे दाखवावी. या लोकांनी सोयीप्रमाणे शिवाजी महाराजांना जेवढे दाखवता येईल तेवढे दाखवत आहेत. तर 'हर हर महादेवा'चे निर्माते दर्शन सांगत आहे, त्यांच्याकडे पुरावा आहे. तर ते पुरावे घेऊन घेऊन बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबीयांना दाखवावे. आपण या चित्रपटाला मराठीतून हद्दपार केला. परंतु अनेक भाषांमध्ये हा चित्रपट दाखवत आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवत असेल तर कोणीतरी बोलायला पाहिजेच, त्यासाठी मी पुढे आलो. त्यासाठी माझ्यावरती खोटा केसेस केल्या आहेत.
राज्यपाल आणि सुधांशू हे इतिहास बदलायला निघालेले आहे.
राज्यपाल आणि सुधांशू हे आपला इतिहास बदलायला निघालेले आहे. मराठी माणसाने यावरती बोलले पाहिजे. आपल्याला ज्याने शिक्षण दिले. शिक्षणाची दार खुले करून दिले. त्या ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय बोलले हे सगळे महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही यांना असंच सोडून दिलं तर, आपले सर्व आदर्श कधी उधळतील हेच आपल्याला कळणार नाही.
शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबा ची पत्र लिहून माफी मागितली होती असा म्हणणारा ठार वेडाच असू शकतो … बोलणारा #भाजप प्रवक्ता pic.twitter.com/QzkPtsVdrK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 19, 2022
असा बोलणारा ठार वेडाच असू शकतो- आव्हाडांचं ट्विट
यासंदर्भात काल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्रिवेदी यांच्या विधानावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असा बोलणारा भाजप प्रवक्ता ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणालेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचं मध्यप्रदेशात प्रस्थान, तरीही राहुल गांधी महाराष्ट्रातच; आज औरंगाबादमध्ये