एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Eknath Shinde : विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे

Eknath Shinde on Wikipedia : एकनाथ शिंदेच्या बंडामुळे देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असतानाच आता जगभरात शिंदेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Eknath Shinde on Wikipedia : सध्या अवघ्या जगाचे लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आणि याचे कारण आहे एकनाथ शिंदे...  शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदे हे नेमके कोण आहे? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे विकिपीडियावर एकनाथ शिंदे हे सध्या मोदी, बायडेन तसेच पुतीन पेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.  

जगातील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया हा आता परवलीचा शब्द निर्माण झाला आहे. विकिपीडिया हा जगात सर्वात जास्त वापरला जाणारा विश्वकोश आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद हे गूगल नंतर विकिपीडियावर देखील  दिसत आहेत. जो बायडन यांच्या बद्दलचा विकिपीडियाचा लेख हा  1,27,104  लोकांकडून वाचला गेला तर एकनाथ शिंदे यांचा लेख  3,35, 060 लोकांनी वाचला. विकिपीडियाच्या अभिषेक सूर्यवंशी यांनी या माहितीस दुजोरा दिला व एकनाथ शिंदे यांचे विकिपीडिया आर्टिकल सध्या राजकीय क्षेत्रात सर्वात जास्त वाचले जात आहे असे सांगितले.


Eknath Shinde : विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे

विकिपीडिया ही साईट म्हणजे फ्री सोर्सच आहे. महाराष्ट्राच्या राजकाराणाला हदरवून सोडणारे एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जगभरातील नागरिक एकनाथ शिंदेंबाबत विकिपीडियावरून  माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.   विकिपीडियावर सध्या एकनाथ शिंदे हे अव्वल स्थानी आहे. एकनाथ शिंदेनंतर अनुक्रमे जो बायडन, पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमाक लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेख 67,848 लोकांनी वाचला आहे. 


Eknath Shinde : विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे

 पाकिस्तान, सौदी, थायलंडमध्येही एकनाथ शिंदेंच्या चर्चा

महाराष्ट्रातील राजकीय गरमागरमीची चर्चा ही केवळ राज्यात देशातच नाही तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.  33 देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्वाधिक सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे हाते. शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानात 54 टक्के, सौदी अरेबियात 57 टक्के, मलेशिया 61 टक्के, नेपाळ 51 टक्के, बांगलादेश 42 टक्के, थायलंड 54 टक्के, जपान 59 टक्के, कॅनडात 55 टक्के लोकांनी सर्च केले. दरम्यान भारतात एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे? याबाबत देखील खूप जास्त प्रमाणात सर्च केलं जात आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे.   

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saundala Gaon : सौंदाळा गावात शिव्या देण्यास बंदी; नियम पाळला नाहीतर 500 रूपये दंड9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 2  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा; विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट
"आता घरी परत जाण्याची वेळ..."; विक्रांत मेस्सीनं इंडस्ट्री सोडली? अभिनयातून संन्यास घेत असल्याची इंस्टाग्रामवर पोस्ट
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Embed widget