एक्स्प्लोर

Maharashtra NCP Political Crisis : साहेब की दादा? राष्ट्रवादीच्या आमदारांची सत्वपरिक्षा! पक्ष एक व्हीप दोन 

NCP Political Crisis : अजित पवारांच्या वेगळ्या वाटेमुळे महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारण तापले आहे.

Maharashtra NCP Political Crisis : अजित पवारांच्या वेगळ्या वाटेमुळे महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय कलह वाढला आहे. 5 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी बोलवण्यासाठी दोन्ही गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. एक पक्ष आणि दोन व्हीप यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभ्रमात पडले आहे. बुधवारी महाराष्ट्राचे राजकारण तापण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी वांद्रे येथे बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

दोन व्हीप जारी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मात्र सत्वपरिक्षा सुरु झाली आहे. शरद पवार साहेब की अजितदादा पवार कुणाच्या पाठिशी उभं राहायचं हा अनेकांना पेच पडला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता अजित पवार यांनी एमईटी वांद्रे येथे पक्षाची बैठक बोलवली आहे. तर दुपारी शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलवली आहे. आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि इतर नेते कोणत्या बैठकीला हजर राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचा व्हीप जारी केला. उद्या पक्षाची बैठक आहे तसं यासाठी सर्व आमदारांनी उपस्थित रहाण्याचा व्हिप जारी करण्यात आला आहे. यशवंत राव चव्हाण सेंटर येथे दुपारी एक वाजता बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे पत्रात म्हटलेय. जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदारांसाठी शशिकांत शिंदे यांनी व्हिप जारी केला आहे. विधान परिषदेचे एकूण आमदारांपैकी अजित पवारांसोबत पाच आमदार तर शरद पवारांसोबत चार आमदार आहेत. रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी,  विक्रम काळे,सतीश चव्हाण हे अजित पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहेत तर एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड, बाबा जानी दुरानी हे शरद पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहेत. 

सुप्रिया सुळेंचे ट्वीट -
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय पवार साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. आणि साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे आदरणीय पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Embed widget