MARD Doctors Strike: कोरोनाचं संकट वाढतंय अन् डॉक्टर संपावर! मार्ड डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप
Maharashtra MARD Doctors Strike: राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचं संकट वाढत असल्यानं चिंता वाढलीय. या चिंतेत भर टाकणारी बातमी असून मार्डचे डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
Maharashtra MARD Doctors Strike: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना चिंता वाढणार आहे. राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून (शुक्रवार) बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील निवासी डॉक्टरांनी उद्यापासून राज्यातील सरकारी रुग्णालये आणि महाविद्यालयामधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर आज शुक्रवारपासून बेमुदत संपावर जणार आहेत. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट संघटनेच्या डॉक्टरांनी आज सकाळी 11 वाजल्यापासून संप सुरू करणार आहेत. जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा मार्डनं इशारा दिला आहे. सेंट्रल मार्डन लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार आहेत.
डॉक्टरांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, कोविड इन्सेन्टिव्ह आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम वसतिगृह सुविधा इत्यादी मागण्या केल्या आहेत. दरम्यान, "शक्रवारी सकाळी 11.30 वाजता उच्च अधिकाऱ्यांनी आम्हाला या विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बोलावलं आहे. परंतु, आम्हाला लेखी अश्वासन हवंय, जे अद्याप आम्हाला मिळालं नाही", असं मार्डचे सदस्य डॉ. अक्षय यादव यांनी सांगितलं आहे.
"आमची प्राथमिक मागणी म्हणजे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. दुसरी, संपूर्ण महाराष्ट्रात वसतिगृहांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे सुधारण्यात यावे. तिसरी, बीएमसी रुग्णालयांच्या निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून टीडीएस कापला जाऊ नये. संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये कोविड प्रोत्साहन मिळालेले नाही. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे", असंही यादव यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागलीय. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टरांनी उद्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-