न्यू इअर सेलिब्रेशनसाठी प्लॅन करताय? त्याआधी जाणून घ्या निर्बंध
New Year Celebration Restrictions : कोरोना बाधितांच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध लागू झाले आहेत.
New Year Celebration Restrictions : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी प्लॅन तयार केले आहेत. मात्र, कोरोन निर्बंधामुळे न्यू पार्टीवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्टीजवर निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्बंधामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये यावर्षी कुठले प्रकारचे कार्यक्रम किंवा न्यू इअर पार्टीज होणार नाहीत.
अनेकजण नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करतात. तारांकित हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये खास पार्टीजचे आयोजन करण्यात येते. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणाऱ्या पार्टीज् रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. अनेकांनी आता रेस्टॉरंट्स मध्ये मित्रपरिवार, कुटुंबासह जेवणाचा बेत आखला आहे. मात्र, रेस्टॉरंट्सना ही क्षमतेच्या 50 टक्के जागांवर ग्राहकांना सेवा देता येणार आहे. त्यामुळे अनेकांना ताटकळत राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यातच पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्याची मागणीदेखील सरकारने फेटाळली होती.
अनेक सोसायटीजमध्ये टेरेस पार्टीचे आयोजन करण्यात येते. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास या पार्टीज रद्द करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. लोकांनी घरातूनच नवीन वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
आदित्य ठाकरे यांनी काय म्हटले ?
इमारतींच्या टेरेसवरील पार्टीबाबतही लोकांनी फेरविचार करावा असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.
न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी काय आहे सरकारची नियमावली ?
1. नव्या वर्षाच्या स्वागातील नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे
2. राज्यात 25 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली असून याचे पालन करावे.
3. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे
4. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजिक करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहाच आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहेय
5. कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मास्क आण सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी निर्जुंतीकीकरणाची व्यवस्था करावी
6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
7. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
8. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
9. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
10. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
11. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
12. तसेच 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत देण्यात आल्या आहे. नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.