एक्स्प्लोर

Raj Thackeray : मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा; शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे ॲक्टिव्ह मोडमध्ये! मुंबईत मनसेच्या मेळाव्यात फटकेबाजी

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. टोल वसुली, भोंगा आणि इतर महत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी हल्लाबोल केला आहे.

Raj Thackeray :  मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. टोलबाबत भाजपला प्रश्न विचारला पाहिजे. टोल वसुलीबाबत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. मुंबईत आज मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यभरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. 

शस्त्रक्रियेचा अनुभव भयंकर होता : राज ठाकरे
शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची पहिलीच सभा आहे. माझ्या शस्त्रक्रियेला 2 महिने पूर्ण झाले आहे. मात्र शस्त्रक्रियेचा अनुभव भयंकर होता असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. उद्या पुणे दौऱ्यावर जातोय. कोरोनामुळे हाडांचा त्रास बळावला होता. प्रवास करताना त्रास होतोय का ते बघतो असं ते म्हणाले. 

टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं? शिवसेना-भाजपला प्रश्न विचारा

यावेळी राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. मनसे कुठलंही आंदोलन अपूर्ण सोडत नाही. टोलमुक्तीचे आश्वासन शिवसेना-भाजपचं होतं. मात्र याबाबत आंदोलन मात्र मनसेनी केलं. शिवसेना-भाजपला कोणी प्रश्न का विचारत नाही? या टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न होता, मात्र हे टोलबाबतच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच सरकारने दिली नाही. म्हणजेच हा टोलचा पैसा सगळ्या पक्षांना जातो, आणि म्हणून नेते टोलबाबत प्रश्न विचारत नाहीत, तसेच मी टोल बंद करून दाखवतो असं राज ठाकरे यावेळी म्हणालेत. 

मनसेच्या आंदोलनानंतर मशिदीवरचे भोंगे बंद झाले : राज ठाकरे

मनसेच्या आंदोलनानंतर मशिदीवरचे भोंगे बंद झाले. यानंतर जवळपास 92 टक्के ठिकाणांवरील भोंगे बंद झाले आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत कसे पोहचता हे महत्वाचं आहे. असं राज ठाकरे म्हणाले

निवडणुका त्यांच्या डोक्यात आहेत

सध्याचं राजकीय वातावरण राज्यासाठी चांगलं नाही. अडीच वर्षात जे घडलं ते चांगलं नव्हतं. फक्त निवडणुका त्यांच्या डोक्यात आहेत, ज्या मतदारांनी 2019 ला मतदान केलं, त्यांना कळतही नसेल की आपण मतदान कुणाला केलं?कोण कुणासोबत आहे, हे कळतच नाही, आणि ही सत्तेची आणि आर्थिक अॅडजस्टमेंट आहे. असं राज ठाकरे म्हणाले.

माझं बंड नव्हतं म्हणून मी बाहेर पडलो : राज ठाकरे

यावेळी शिवसेना सोडतानाची कहाणी सांगत राज ठाकरे म्हणाले, माझं बंड नव्हतं म्हणून मी बाहेर पडलो, तेव्हा बाळासाहेबांनी मला मिठी मारली. मी मातोश्रीवर गेलो तेव्हा तिथे माझ्यासोबत मनोहर जोशी होते. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले ‘आता जा’. त्यांना समजलं होतं मी जाणार आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. तुमच्या विश्वासावर नवा पक्ष उभा केला. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडावर भाष्य करताना छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या बंडासोबत माझ्या त्या निर्णयाशी तुलना करू नका असे राज ठाकरे यांनी सांगितले. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत दुसऱ्या पक्षात सामिल झाले. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून मी बाहेर पडलो असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. 

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी, भाजपच्या भूमिकेकडे मनसेचे लक्ष

राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मागील दोन महिने राज ठाकरे विश्रांती घेत असल्याची माहिती होती. मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे राजकारणात ॲक्टिव मोडमध्ये आले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.  मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढली होती. आता राज ठाकरे ॲक्टिवह मोडमध्ये आल्यानंतर ही जवळीक कायम ठेवणार की 'एकला चलो रे' ची भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी राज्यात जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. मध्यंतरीच्या काळात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनासोबत नसल्यामुळे निर्माण झालेली मराठी मतांची पोकळी शिंदे सेनेमुळे आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे मनसेचे देखील लक्ष असणार आहे.

शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे-भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. याला आणखी खतपाणी मिळालं ते मनसेने भाजपला राज्यसभा, विधान परिषद आणि शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. त्यानंतर पुढे देखील हिच चर्चा कायम असल्याची पाहायला मिळालं होतं. कारण भाजपच्या सांगण्यावरुन शिंदे गट मनसेत विलीन होणार यापासून ते नव्या सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद मिळणार इथपर्यंत चर्चा सुरुच होत्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Speech : शिवसेना सोडण्याआधी बाळासाहेब काय म्हणाले, राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Raj Thackeray : राज ठाकरे अॅक्टिव्ह मोडमध्ये! शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्या बैठकीत दिले 'हे' आदेश

सु्प्रिया सुळे यांच्या मतदारसंघात मनसेचा झेंडा फडकवा; राज ठाकरे यांनी दिली वसंत मोरे यांना नवी जबाबदारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्तनालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Embed widget