एक्स्प्लोर

चौथ्या टप्पासाठी उद्या अकरा मतदारसंघात निवडणुकांची रणधुमाळी; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न

Lok Sabha elections 2024 : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्पासाठी उद्या मतदानाची रणधुमाळी पार पडणार आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर सर्व स्थरावरील प्रशासन सज्ज झाले आहे.

Lok Sabha elections 2024 Phase Four : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्पासाठी उद्या मतदानाची रणधुमाळी पार पडणार आहे. एकूण पाच टप्प्यातील निवडणुकांपैकी राज्यात तीन टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. तर उद्या, 13 मे रोजी राज्यातील उर्वरित 11 लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्याच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघाचा समावेश आहे.

या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान केंद्रावरील गैरसोयीचा परिणाम टक्केवारीवर होऊ नये म्हणून सर्व स्थरावरील प्रशासन सज्ज झाले आहे. तर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने कसोशीचे प्रयत्न सुरू केले आहे. राज्यातील जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच योग्य ती तयारी केली होती. मात्र, गेल्या 8 दिवसांपासून राज्यात कुठे वाढते ऊन, वातावरणातील वाढलेली आर्द्रता, तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा लक्षात घेता, काही विशेष काळजी घेतली जात आहे.   

मतदान प्रक्रिया गतिमान करण्यासाठी नव्या 'ॲप' ची मदत 

मतदान प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं एक ॲप डेव्हलप केलंय. पी एम एस 24 असं या ॲपचे नाव आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यास, अथवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास, कुठली मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास या ॲप वर क्लिक केल्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला तात्काळ मतदान केंद्रावरील अडचण समोर येणार आहे. शिवाय प्रत्येक दोन तासाची आकडेवारी देखील जलद गतीने जिल्हा प्रशासनाला मिळेल. मात्र हे ॲप केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापूर्तेच मर्यादित असणार आहे. 

2040 मतदान केंद्र सज्ज  

छत्रपती संभाजी नगर लोकसभा निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून ईव्हीएमचे वाटप देखील सुरू झाल आहे. 2040 मतदान केंद्रावर उद्या मतदान होईल. यासाठी दोन हजारपेक्षा अधिक कर्मचारी तैनात आहेत. तसेच पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त असणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

दिव्यांग बांधवांनी विशेष मतदान केंद्र

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून  वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यामध्ये तीन वेगळे मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. दिव्यांग बांधवांनी मतदान करावा यासाठी संपूर्ण मतदान केंद्रावरतीच दिव्यांग अधिकारी नेमण्यात आलेले आहेत.  

त्याच सोबत महिलांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्व महिला अधिकारी एका मतदान केंद्रावर नेमण्यात आलेल्या आहेत. या सर्व महिला अधिकारी उद्या मतदान केंद्रावर पिंक कलरच्या साड्या परिधान करून महिलांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत. त्याच सोबत आंबेगाव तालुक्यातील शेवटचं टोक अर्थात आदिवासी भागात युनिक मतदान केंद्र तयार करण्यात आलेला आहे. 

2061 मतदान केंद्रावर 19 लाख 67 हजार मतदार बाजावनार मतदानाचा हक्क

जालना लोकसभेमध्ये मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, बॅलेट आणि कन्ट्रोल युनिट सह व्ही व्ही पॅट चे वितरण होतेय.  जवळपास 8 हजार 244 महसूल कर्मचारी या सर्व प्रक्रियेत सहभागी असून, जालना लोकसभेत 8 अती संवेदनशील केंद्र आहेत. त्यामुळे या मतदानकेंद्रासह इतर सर्वच मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. जालना-लोकसभेत 2061 मतदान केंद्रावर 19 लाख 67 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहते. 

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज

शिर्डी लोकसभा तसेच दक्षिण नगर लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने मिशन 75 हाती घेतलय. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर , शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपुर आणि नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मतदारसंघात संपुर्ण निवडणुक प्रकिया निपक्ष: निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालय. अवकाळी पावसाचे सावट असल्याने प्रशासनाने त्यासाठी देखील उपाययोजना केल्या असून मिशन 75 यशस्वी करण्यासाठी प्रशासन कामाला लागलय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget