एक्स्प्लोर

शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट? विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना

महाराष्ट्र सरकार गोरगरीब, मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशानं एक योजना आखत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. विधानसभा निवडणुकीआधी ही योजना सुरु करण्याची शक्यता आहे.

Scheme for poor women : केंद्र सरकार (Central Govt) तसेच विविध राज्यातील सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरीबांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा उद्देश असतो. दरम्यान, महिलांच्या उन्नतीसाठी विविध राज्य सरकारे चांगल्या योजना राबवत आहेत. यातीलच एक योजना म्हणजे 'लाडली बहना योजना'(Ladli Bahna Yojana). ही योजना मध्य प्रदेश सरकार चालवते. आता याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील गोरगरीब, निम्न, मध्यमवर्गीय महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्याच्या उद्देशानं एक योजना आखत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी जर ही योजना सुरु केली तर याचा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गरिबांच्या खात्यात आठ हजार रुपये जमा होतील, असे आश्वासन दिले होते. उत्तर प्रदेशसह काही राज्यात या घोषणेचा काँग्रेसला फायदा झाला. त्यामुळं याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे सरकार देखील अशी योजना आखण्याच्या तयारीत आहे.  या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दीड कोटी महिलांना होणार असल्याचं बोललं जात आहे. मध्य प्रदेश सरकार  लाडली बहना योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर 1250 रुपये जमा करते. यापेक्षा अधिक रक्कम देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं केल्याची माहिती देखील मिळत आहे. 

नेमकी काय आहे लाडली बहना योजना?

  • सध्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहना योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात 1250 रुपये जमा केले जातात. 
  • या योजनेनंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपला विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला होता. या योजनेला भाजप सरकारनं पसंती दिली होती. 
  • मध्य प्रदेशात 1 कोटी 29 लाख महिलांना लाडली बन योजनेचा लाभ मिळतो. गेल्या 11 महिन्यांपासून महिलांना हा लाभ दिला जातो. विवाहिता, घटस्फोटीत, विविध भगिनींना या योजनेचा लाभ दिला जातो. 
  • या याजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची अट ही 21 ते 60 वर्ष आहे. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या पुढे असू नये, अशी अट घालण्यात आली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र सरकार देखील अशीच एक योजना सुरु करणार असून, त्यामध्ये देखील याच अटी असण्याची शक्यता आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना सुरु करण्याची शक्यता वर्तवली जातेय.  

महत्वाच्या बातम्या:

PM Pik Vima Yojana : एक रुपयात, पीक विमा; शेतकऱ्यांसाठी पंतप्रधानांची खास योजना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलंNawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special ReportMaharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special ReportAcharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य  मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
राहुल गांधींचा दावा खोटा, शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला आतापर्यंत 98 लाखांची मदत, लष्काराची माहिती
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
Hathras stampede : हाथरसमध्ये नेमकं काय घडलं? 121 जणांना गमावावा लागला जीव
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली
पुण्यात झिकाचे रुग्ण वाढले; केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क, राज्यासाठी जारी केली नियमावली
जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 
जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांना घाबरून पळ काढला, 6 जणांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू 
मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण
मरावे परी, किर्तीरुपी उरावे... ब्रेनडेड बँक अधिकाऱ्यामुळे चौघांना जीवदान; विमानाने ह्रदयाचे स्थलांतरण
Horoscope Today 30 June 2024 : महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
महिन्याचा शेवटचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' राशींना धनलाभाचे योग, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget