वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी भ्रष्टाचार; वन अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करा, वन परिक्षेत्र अधिकारी संघटनेची मागणी
Forest Department Transfer: वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चौकशी निष्पक्षपणे करावी. तसेच बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप टाळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
Forest Department Transfer: वन विभागातील (Forest Department) वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजेच आर एफ ओ च्या बदलीवरून वन विभागात वादंग माजला आहे.अनेक आमदारांनी वनविभागातील प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. मात्र महाराष्ट्रातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (RFO) महाराष्ट्रातील संघटनेने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात याव्या अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर वन विभागातील इतर सर्व बदल्या ही ऑनलाइन पद्धतीने करण्यात याव्या.
सध्या वनमंत्र्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार प्रशासनाकडे दिले असले तरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या संघटनेने भविष्यात बदलीचे अधिकार प्रशासनाकडेच ठेवून त्या बदल्या अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार नव्हे, तर ऑनलाईन पद्धतीने कराव्यात. प्रत्येक अधिकाऱ्याने कुठे बदली मागितली आहे. कोणत्या जागा रिक्त आहेत, हे सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दिसाव्या अशी पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
वनमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कोणत्या मागण्या केल्या आहेत?
- वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चौकशी निष्पक्षपणे करावी.
- बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप टाळावा
- ज्या वन अधिकाऱ्यांची बदली नियमानुसार झाली आहे त्यांची स्थगिती हटवण्यात यावी.
- तसेच बदली समुपदेश करताना बदली पात्र अधिकाऱ्याने दिलेल्या 10 पर्यांयापैकी एक ठिकाण द्यावे.
- अधिकाऱ्यने दिलेल्या पर्यायांपैकी ठिकाण उपलब्ध नसल्यास बदली पात्र अधिकाऱ्याचे वैयक्तिक समुपदेशन करावे आणि नियमाला धरून बदली करण्यात यावी
प्रकरण नेमके काय?
वन खात्याने 31 मे 2023 रोजी 39 सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) यांच्या बदल्या केल्या, तर 12 जणांना त्याच जागेवर मुदतवाढ दिली. यात काही एसीएफच्या बदल्या प्रादेशिक टू प्रादेशिक, तर काही जणांना पुन्हा तोच विभाग दिल्याची तक्रार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या बदल्यांमध्येही अर्थकारण झाल्याची चर्चा थेट मंत्रालयात होत आहे. सहाय्यक वनसंरक्षकांच्या बदल्यांची फाईलसुद्धा वनमंत्र्यांनी मागवली आहे. त्यामुळे एसीएफच्या बदल्या थांबण्याची शक्यता आहे.
राज्यात सुमारे 200 पेक्षा जास्त वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) च्या बदल्यांमध्ये गैरप्रकार झाले आहेत. अनियमितता झाल्याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी. राव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमीता बिश्वास यांची सोमवार, 5 जून रोजी वन मंत्रालयात प्रधान सचिवांच्या दालनात पेशी होणार आहे.
कोणी तक्रारी केल्या आहेत?
हरिभाऊ बागडे, राम सातपुते, रणधीर सावरकर आणि आशिष जयस्वाल या चार आमदारांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे.
हे ही वाचा :
Forest Department Transfer : सुधीर मुनगंटीवार यांच्या वन विभागात पैशांच्या मोबदल्यात बदल्या झाल्याचा आरोप