Maharashtra Budget 2021 : समृद्धी महामार्गाचं 500 किमीचं काम पूर्ण; नागपूर ते शिर्डी मार्ग 1 मेपासून सुरु होणार : अजित पवार
पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे. त्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटी किमतीच्या आठ पदरी रिंग रोडचे करण्यात येईल.
Maharashtra Budget 2021 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2021 विधानसभेत सादर केला. राज्यातील रस्तेवाहतूक, रेल्वे वाहतूक संबंधी अनेक मोठ्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या. मुंबई-नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 700 किमी पैकी 500 किमीचे काम पुर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी मार्ग महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2021 रोजी मार्ग खुला करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. दक्षिण मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाला विलासराव देशमुख यांचं नाव देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
पुण्यात रिंग रोडसाठी 26 हजार कोटी
पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे. त्यासाठी 170 किमी आठ पदरी लांबीच्या रिंग रोडची उभारणी करण्यात येणार आहे. या रिंग रोडसाठी 26 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. रिंग रोडसाठीच्या भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल. या रिंग रोडमुळे पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सुटू शकते, असं अजित पवार यांनी म्हटलं.
नांदेड ते जालना 200 किमी लांबीच्या नव्या मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्यातील रस्त्याची नियमिती देखभाल करण्यासाठी निधी उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांअंतर्गत वित्तीय विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडेदहा किलोमीट लांबीच्या दोन भुयारी मार्गाच्या, तसेच 2 किलोमीटर लांबीच्या 2 पुलांचा समावेश असलेल्या 6 हजार 695 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरु असून ते डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
रेवस ते सिंदुधुर्ग सागरी महामार्ग
कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंदुधुर्ग जिल्ह्यातील रेड्डी अशा 540 किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाच्या कामासाठी 9 हजार 573 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
Maharashtra Budget 2021 LIVE: अर्थसंकल्पात कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद
ग्रामीण भागातील 10 हजार किमी लांबीच्या रस्त्यांची कामं हाती घेणार
ग्रामीण भागातील 40 हजार किमीची लांबीची कामे 2020 ते 2024 दरम्यान हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊनमुळे ती काम होऊ शकली नाहीत. त्यापैकी 10 हजार किमीची कामं यावर्षी हाती घेण्यात येणार आहेत, असं अजित पवार यांनी सागितलं.
मुंबई : पूर्व मुक्त मार्ग
दक्षिम मुंबईला पूर्व उपनगरांशी जोडणाऱ्या पूर्व मुक्त मार्गाचे नामकरण 'विलासराव देशमुख मुक्त मार्ग' करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पाच्या वेळी जाहीर करण्यात आला.
Maha Budget 2021 : अर्थसंकल्पातून अजित पवारांनी पुण्याला काय काय दिले?
राज्यातील रेल्वे मार्ग
पुणे-नाशिक या दोन शहरांदरम्यानच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून 16 हजार 139 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील अहमदनगर, बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गांचे काम वेगाने केले जाणार आहे.
पाहा... राज्याचा अर्थसंकल्प लाईव्ह