एक्स्प्लोर

Maha Budget 2021 : अर्थसंकल्पातून अजित पवारांनी पुण्याला काय काय दिले?

कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी (Ajit Pawar) पुणे (Pune) जिल्ह्याला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी पुणे जिल्ह्याला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळं अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. देशात आणि त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी खालील तरतूदी करण्यात आल्या आहेत.

पुणे, नगर, नाशिक जलद रेल्वेला मंजुरी

पुणे-नगर-नाशिक दरम्यान 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी 16 हजार 139 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयाच्या बांधकामासाठी 28 कोटींची तरतूद

राज्यात 7जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेची घोषणा अजित पवार यांनी केली. यामध्ये सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जाणार आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातल्या वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांसाठी अनेक दिवसांपासून निवासस्थानाचा मुद्दा चर्चेत आला होता. या निवासस्थानांच्या बांधकामासाठी 28 कोटी 22 लाख अंदाजित खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा केली.

पुण्यात आठ पदरी रिंग रोडची उभारणी (Pune Ring Road)

पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे. त्यासाठी 170 किमी लांबीच्या 26 हजार कोटी किमतीच्या आठ पदरी रिंग रोडचे करण्यात येईल. यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल. या रिंग रोडमुळे पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सुटू शकते, असं अजित पवार यांनी म्हटलं.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडेदहा किलोमीट लांबीच्या दोन भुयारी मार्गाच्या, तसेच 2 किलोमीटर लांबीच्या 2 पुलांचा समावेश असलेल्या 6 हजार 695 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरु असून ते डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यात आणखी एक विमानतळ

पुणे शहरात नवीन विमानतळ उभारण्यात येणार असल्याचं पवार म्हणाले. अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली.

पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून, त्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात बालेवाडी येथए क्रीडा संकुल सुरू आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Maha Budget 2021, Health: आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद : अजित पवार

पाहा... राज्याचा अर्थसंकल्प लाईव्ह

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget