एक्स्प्लोर

Lata Mangeshkar Critical : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, राज ठाकरे भेटीसाठी रुग्णालयात दाखल

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे.

Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली आहे. याबाबतची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. लता मंगेशकर यांचे वय 92 वर्ष आहे.

लतादीदींना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर गेल्या 27 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी, उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना  'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. 

92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' जवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते.  काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी निवेदन दिलं होतं. लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही. ती गोपनीय बाबतीत थेट घुसखोरी होईल. कृपया प्रकृतीबाबत कोणत्याही त्रासदायक अफवा पसरवू नका, असं निवेदनात म्हटलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Listठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी,65 उमेदवारांचा यादीत समावेशMahavikas Aghadi PC : शिवसेनेची पहिली यादी जाहीर! महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदSanjay Raut On MVA Seat Allocation : 85-85-85 मविआचा फॉर्मुला, आमचं जागावाटप सुरळीत : संजय राऊतSanjay Kadam Dapoli : दापोली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ? संजय कदम आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!
Kurla Assembly Seat : कुर्ला विधानसभेची लढत ठरली, ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर रिंगणात, शिंदेंकडून मंगेश कुडाळकर लढणार
कुर्ला विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंकडून प्रविणा मोरजकर मैदानात, शिंदेंच्या मंगेश कुडाळकरांना आव्हान
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
ठाकरेंकडून 11 उमेदवारांची पहिली यादी, एबी फॉर्मही दिले; समीर भुजबळांच्या आशा मावळल्या
Embed widget