एक्स्प्लोर

Sanjay Raut : संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता - उद्धव ठाकरे

ED Raid On Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं स्वत: उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं स्वत: उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. रविवारी सकाळपासून संजय राऊत यांच्या घरी ईडी तळ ठोकून आहे. आठ ते दहा तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. राजन विचारे यांच्या नेतृत्वात ठाणे येथून शेकडो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर आले होते, यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. 

आज संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखठोख लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पण हे सर्व कारस्थान निर्लज्जपणाचा कळस सुरु आहे. लाज, लज्जा, शरम सोडून हे कारस्थान सुरु आहे, असा टीकेचा बाण उद्धव ठाकरे यांनी सोडलाय. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचे ( ED ) पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case) संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर जमा झाले आहेत. सकाळपासूनच शिवसैनिक मातोश्रीबाहेर ठिय्या मांडून आहेत. 

सकाळपासून नेमकं काय झालं?

रविवारी सकाळी सात वाजता दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊत यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी दाखल झाले. 

सकाळी 7.15 वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले. यावेळी संजय   राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत घरीच होते. 

सकाळी 8.20 वाजता सुनिल राऊत खिडकीत आले. 

सकाळी 8.40 वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते संजयर राऊतांच्या घराबाहेर जमले आणि राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. 

सकाळी 8.46 ते 8.50 दरम्यान राऊतांचे चार ट्विट, शिवसेना सोडणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही असे चार ट्विट संजय राऊत यांकी केले.  

सकाळी नऊ वाजता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांची प्रतिक्रीया आली. राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, राऊतांच्या आजच अटकेची शक्यता, शिरसाठ यांची प्रतिक्रीया. 

सकाळी 9.30 वाजता संजय राऊतांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. 

सकाळी 10.28 वाजता संजय राऊतांचे वकील विक्रांत साबणे पोहोचले. 

सकाळी 11.07 वाजता स्वत: संजय राऊत घराच्या खिडकीत आले आणि कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. 

सकाळी 11.25 वाजता आढावा बैठकीसाठी जाताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रीया दिली. 

दुपारी एक वाजता औरंगाबादमध्ये आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. कर नाही तर डर कशाला अशी राऊतांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. 

दुपारी 1.30 वाजता राजन विचारे दहा बसेस भरून ठाण्यातील शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकच्या माघारीवर जळगावचा तिढा अडकला, गिते-हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीची धावपळ; भाजपच्या संकटमोचकांना यश मिळणार?
नाशिकच्या माघारीवर जळगावचा तिढा अडकला, गिते-हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीची धावपळ; भाजपच्या संकटमोचकांना यश मिळणार?
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
Share Market Crash : अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
अमेरिकेत AI कंपन्यांचा फुगा फुटला, 2026 मधील सर्वात मोठी घसरण, भारताला फायदा होणार, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Nagpur Crime: नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
नागपूरमध्ये देवीच्या मंदिरात चोरी, पाया पडल्यानंतर चोराने गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचलं, पाहा PHOTOs
US Share Market Crash : अमेरिकेन शेअर बाजारात हाहाकार, 2 ट्रिलियन डॉलर बुडाले, भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती 
ज्याची भीती होती तेच घडलं, अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले, आता भारतीय शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चे संकेत
Embed widget