Devendra Fadnavis : परिवार वाचवण्यासाठी पाटण्यात विरोधकांची बैठक, याचा परिणाम होणार नाही; देवेंद्र फडणवीसांची टीका
Devendra Fadnavis : विरोधी पक्षांची बैठक ही परिवार वाचवण्यासाठी असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली
Devendra Fadnavis : पाटण्यात (Patna) आज होत असलेली विरोधी पक्षांची बैठक ही परिवार वाचवण्यासाठी असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं या बैठकीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटंबाकडे सत्ता कशी राहू शकेल यासाठी हे विरोधक एकत्र आल्याचे फडणवीस म्हणाले. मेहबुबा मुफ्तीच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जात असल्याचेही फडणवीस म्हणाले.
जनता मोदीजींच्या पाठीशी
विरोधकांसाठी राज्य चालवणं हा धंदा आहे. तर भाजप आणि मोदीजी यांच्यासाठी ती सेवा असल्याचे फडणवीस म्हणाले. मागच्या काळात 2019 ला हे सगळे लोक एकत्र आले होते. पण जनता मोदीजींच्या पाठीशी राहिल्याचे फडणवीस म्हणाले. 2024 मध्ये मागच्या वेळीपेक्षा जास्त ताकदीने जनता मोदीजींच्या पाठीशी उभी राहील असे फडणवीस म्हणाले. त्यामुळं या बैठकीचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. सातत्यानं मेहबुबा मुफ्तीच्या नावावर भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जात आहेत. पण त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. त्यामुळं सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता सगळ्या प्रकारचे तडजोड करण्यासाठी ते तयार असल्याचे फडणवीस म्हणाले.
पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक सुरु
बिहारची राजधानी असलेल्या पाटणा इथं आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. भाजपविरोधातले 23 पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांनी या बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीसाठी जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्रातून देखील शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, संजय राऊत तसेच इतर नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं हे सर्व विरोधी पक्ष आज पाटण्याच्या मंचावरुन काही घोषणा करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नितीश कुमारांचा पुढाकार
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष बाकी आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सातत्याने ते प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: