एक्स्प्लोर

CM Eknath Shinde On Thackeray :आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस; मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची यादीच काढली

CM Eknath Shinde On Thackeray Scam : अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

CM Eknath Shinde On Thackeray Scam :  विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना  शिवसेना ठाकरे गटावर (Shiv Sena UBT)  जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता घोटाळ्यांची यादीच मांडली. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याचे सांगत सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आमच्यावर टीका करताना एका मर्यादेपर्यंत टीका करावी असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळात भीतीच्या वातावरणात लोक जगत असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरू होता. कफनचोर, खिचडी चोर असा बिरुद देखील कमी पडतील असा भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी म्हटले. ऑक्सिजन प्लांटमध्ये ही भ्रष्टाचार झाला. काही लोकांच्या कृपेने उत्तर प्रदेशातील महामार्ग कंस्ट्रक्शन कंपनीला कामे दिली. आदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.  

सबका एकही मालिक, सब का मालिक एक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तुफान टीका करताना म्हटले की, रोमिन छेडा हा त्याचा प्यादा आहे. सुरुवात मुंबईतील वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षापासून झाली. हायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिले. पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एकही मालिक आणि सब का मालिक एक असल्याचे त्यांनी म्हटले. अनेकदा एक एक महिन्याचे काम दाखवून सातत्याने काम देण्यात आले.  या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम दिले. त्याशिवाय फिल्टर पंप आणि अनेक कामे देण्यात आली. 

याच कंपनीला जुहू रुग्णालयात हाऊस कीपिंग काम देण्यात आले. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात काम देण्यात आले. हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसीशी संबंधित काम देण्यात आले. 

ही कंपनी काय काय करते याची जंत्री फार मोठी आहे. माझे डोके गरगरायला लागले असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार. पण, आता हे सगळे पुराव्यानिशी सगळं बाहेर येणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. जिथे टेंडर तिथे सरेंडर असा प्रवास सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 

सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी

रस्ते बनवणाऱ्या कंपनीला कंत्राटे देत या लोकांनी आरोग्य व्यवस्थेला रस्त्यावर आणले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी असेही त्यांनी म्हटले.  सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे बोगस रुग्ण व औषध दाखवण्यात आली. महापालिका तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे. या सगळ्याबाबतची माहिती घेतली आहे. या लुटलेल्या दौलतीमधून कुणी घरे भरली असा सवाल करताना आरोप करताना विचार करा, नाहीतर याहून अधिक पोतडीत असल्याचा सूचक इशारा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

अरेबियन नाईट्ससह पर्शियन नाईट्सच्या  सुरस कथा पुढे आल्यात

300  ग्रॅम ऐवजी 100 ग्रॅम खिचडी दिली. गोरगरिबांच्या तोंडातील 200 ग्रॅम खिचडीचा घास हिरावून स्वतः ची तुंबडी भरली. कुणाच्या खात्यात किती पैसे हे उघड झाले आहे, ते बाहेर येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. सह्याद्री रिफ्रेशमेंट हे कदम व पाटकर यांच्याशी संबंधित आहे. पात्रतेसाठी दाखवलेले किचन हे पर्शियन दरबार हॉटेलच्या मालकाचे होते. त्या मालकाला माहितच नव्हते की आपले किचन खिचडी साठी दाखवले आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे
अरेबियन नाईट्ससह पर्शियन नाईट्सच्या  सुरस कथा पुढे आल्या आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. 

उद्धव ठाकरेंवर टीका 

आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये घरात बसून एक नंबर कसे होतात असा सवाल करताना  तो नंबर पुढून नाही, तर शेवटून होता अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Embed widget