एक्स्प्लोर

बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार! कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी, आता रेल्वेची प्रतीक्षा 

बीडच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.नगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आज कड्यापर्यंत ट्रॅकची चाचणी केली.

बीड : बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आज अहमदनगरहून कड्यापर्यंत रेल्वे इंजिनने ट्रॅकची चाचणी केली. पटरीवरून रेल्वे इंजिन धावतानाचे चित्र पाहून जिल्हावासियांना स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र आता रेल्वे कधी धावणार याकडे प्रतीक्षा लागली आहे.

आज दुपारच्या सुमारास झुकझुक आगीनगाडीचे इंजिन अहमदनगरवरून आष्टीच्या दिशेड मार्गस्थ झाले. त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास या रेल्वे इंजिनचे आष्टी तालुक्यामध्ये आगमन झाले. सदरील रेल्वे इंजिन हे ट्रॅकची चाचणी करत असून येत्या काही दिवसात लवकरच हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. कडा स्थानकात रेल्वेचे इंजिन येताच अनेक बघ्यांनी इंजिन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

गतवर्षी बीड जिल्ह्याच्या हद्दीवर आष्टी तालुक्यात प्रत्यक्ष 35.5 किमी अंतरावर हाय स्पीड रेल्वे रूळावर धावली. या अगोदर  अहमदनगर ते नारायणडोहपर्यंत बारा किमी रेल्वेची इंजिन चाचणी घेण्यात आली होती त्यानंतर अहमदनगर ते सोलापूरवाडी 35.5 किलोमीटर अंतरावर प्रत्यक्ष रेल्वे धावली. 

निधीअभावी किंवा राजकीय इच्छाशक्तीअभावी या रेल्वेचे काम अनेक वर्षापासून रखडले होते. मागील सात वर्षांपूर्वी बीड रेल्वेसाठी भरघोष असा निधी उपलब्ध करून आला.शिवाय राज्याने देखील अर्धा वाटा उचलला. या कामासाठी माजी ग्रामविकास मंत्री तथा बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला,त्यामुळे सर्व काही शक्य झाले असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 

अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे.या रेल्वे मार्गाची मागणी फार जुनी होती. मात्र, नगर बीड परळी या 261 किलोमीटरच्या  रेल्वे मार्गाचा सुरूवातीला 1995 मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी केवळ 353 कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र, बीड-नगर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने निधी देण्यास टोलवाटोलवीच केली गेली.अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्याने या रेल्वे मार्गासाठी आता 2800 कोटीची आवश्यकता आहे. पण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव  या 27 वर्षाहून अधिक काळापासून रखडलेल्या कामाकडे लक्ष दिले. त्यामुळे हे काम प्रगतीपथावर आले. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget