Sanjay Raut on Devendra Fadnavis: देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात, 'या' एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या! दुध का दूध पानी का पानी होईल; संजय राऊतांनी 'हनी' बाॅम्ब टाकला
Sanjay Raut on Devendra Fadnavis: शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार (तेव्हा )याच ट्रॅपमुळे पळाले. असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपची चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा साप इन्कार करताान ना हनी ना ट्रॅप असल्याचे सांगत त्यांनी शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, आज (21 जुलै) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात की, मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात, महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले,या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या! दुध का दूध पानी का पानी होईल! 4 मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले 4 तरुण खासदार (तेव्हा )याच ट्रॅपमुळे पळाले. असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यामुळे ट्रॅपचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रफुल लोढा नावाच्या व्यक्तीचा तो फोटो असल्याचे समजते. याची सूत्रं जामनेर, मुंबई, नाशिक आणि दिल्लीमधून हलली आहेत, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
मुख्य मंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात,
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 21, 2025
महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले:
या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या!
दुध का दूध पानी का पानी होईल!
४ मंत्री
अनेक अधिकारी अडकले आहेत!
शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार (तेंव्हा )याच ट्रॅप मुळे पळाले .
pic.twitter.com/DduL723OOw
पण ना हनी आहे ना ट्रॅप
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपी प्रकरणाची चर्चा आहे. पण ना हनी आहे ना ट्रॅप. नाना पटोलेंनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवत बॉम्ब आणला होता असं समजतं, पण नानाभाऊंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. ते गृहखात्यापर्यंत पोहोचवलंच नाही, कोणत्याही आजी-माजी मंत्र्याची हनी ट्रॅपची तक्रार नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते. दुसरीकडे, राज्यात गेल्या आठवडाभरापासून हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होत आहे. 72 आजी- माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. फडणवीस म्हणाले होते की, सध्या असं वातावरण झालंय की आजी-माजी मंत्री एकमेकांकडे संशयाने बघत आहेत. कोण फसलंय असा प्रश्न सर्वांना पडू लागलाय. कोणत्याही आजी-मंत्र्यांची हनी ट्रॅपची तक्रार नाही अथवा पुरावेही नाही. अशा बाबतची एक तक्रार नाशिकमधून आली होती.
एका महिलेने उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार दिली होती. ही तक्रार महिलेने मागेही घेतली होती. नाशिकच्या ज्या हॉटेलचा उल्लेख होतोय त्या हॉटेलचा मालक काँग्रेसचा उमेदवार होता, असा दावा फडणवीसांनी केला. आरोप करावेत पण पुरावेही ठोस असले पाहिजे, असा टोला त्यांनी पटोलेंना लगावला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
























