अमली पदार्थ तस्करी प्रकरणी NIA ने ताब्यात घेतलेल्या आरोपीचा नांदेड कारागृहात मृत्यू
नोव्हेंबर महिन्यात नांदेड येथे NIA ने एका व्यापारी संकुलात अफू बोंडे/अफीम पकडली होती. त्या प्रकरणात तीन आरोपींना NiA ने ताब्यात घेतले होते.
नांदेड : येथील अमली पदार्थ प्रकरणात 18 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी सुनावलेला व नांदेड येथील कारागृहात असणारा संशयीत आरोपी जितेंद्रसिंग परगणसिंग भुल्लर याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाजीराबाद पोलिासांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जितेंद्रसिंग या संशयीत आरोपीचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यात नांदेड येथे NIA च्या मुंबईने शाखेने एका व्यापारी संकुलात अफूबोंडे/अफीम पकडली होती. त्या प्रकरणात तीन आरोपींना NiA ने ताब्यात घेतले होते. त्यातील आरोपी जितेंद्रसिंग भुल्लर (कैदी क्रमांक 2292/2021) हा तुरुंगातील बॅरेकमध्ये झोपला होता. यावेळी इतर कैद्यांनी त्याला आवाज दिला पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर कारागृहातील सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले. परंतु, रूग्णालयात पोहोचेपर्यंत जितेंद्रसिंगचा मृत्यू झाला होता.
नांदेड येथील कारागृह हे तब्बल 60 ते 70 वर्षा पासूनचे असून याची क्षमता ही 160 कैद्यांची आहे पण या घडीला या तुरुंगात 539 एवढे कैदी आहेत. या प्रकरणाविषयी कारागृह अधीक्षक सोनवणे व तुरुंग अधिकारी माधव खैरगे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
कारागृहाची तपशीलवार माहिती
जवळपास 60 ते 70 वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या जिल्हा कारागृहाची क्षमता 160 कैद्यांची आहे. परंतु आज कोरोना व ओमायक्रोनच्या वातावरणात या कारागृहात तब्बल 539 कैदी आहेत. त्यातील महिला कैदी39 आहेत.तर 500 पुरूष कैदी आहेत. या कारागृहात 7 बॅरेक आहेत. त्यातली एका बॅरेकमध्ये महिला तर 6 बॅरेक मध्ये पुरुष कैदी आहेत. प्रत्येक बॅरेक मध्ये 100 च्या जवळपास कैदी कोंडवाड्या प्रमाणे कोंबण्यात आले आहेत.
कैद्यांच्या व कारागृहाच्या सुरक्षेसाठी 51 कर्मचारी, 2 अधिकारी तर 1 क्लर्क व 1 मिश्रक असे एकूण-56 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कैद्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी अद्याप निवासी डॉक्टर या कारागृहास नाही. त्यासाठी आठवडा भर तीन ते चार डॉक्टर येतात, पण रविवारी कोणताही डॉक्टर येत नाही. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे एखाद्या कैद्याची अचानक तब्येत बिघडल्यास त्यांना वेळेवर उपचार मिळत नाही. उपचारासाठी बाहेर न्यायचे म्हटले तर त्यासाठी पोलीस पथक असायला हवे, पण पोलीस पथक वेकेवर मिळत नाही. त्यामुळे कैद्याला वेळेवर उपचार मिळत नाहीत. परिणामी अनेक कैद्यांचे आजार बळावतात व मृत्यू होतो. अशी माहिती कारागृह अधिकारी यांच्या कडून एबीबी माझाला देण्यात दिली आहे.
ही पहिलीच घटना नाही
गेल्या काही महिन्यांपूर्वी भीमराव यादवराव वाघमारे नावाचा बंदी (क्रमांक 1229/2021 ) हा 17 जून 2021 रोजी तुरुंगात मृत पावला होता. या प्रकरणी मयत आरोपीची पत्नी सुनीता वाघमारे यांनी आपल्या पतीचा मृत्यू हा कारागृह अधीक्षक आणि कारागृहातील कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप केला होता. त्या प्रमाणे तशी तक्रारही कारागृह प्रशासनाच्या विरोधात देण्यात आली होती.
इतर बातम्या
अभिमानास्पद! सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांतच्या चित्रपटाला मराठमोळ्या लक्ष्मीकांतचे संगीत
"काय गं कुसूम, मुंबईला कशी?" नावं लक्षात ठेवण्याचा भन्नाट किस्सा शरद पवारांनी सांगितला!