Prafull Patel : आरक्षणाला धक्का लागल्यास शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य
Prafull Patel :आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. असं गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रस अजित पवार (Ajit Pawar) गाटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.
Prafull Patel भंडारा : आरक्षणाला (Reservation) जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. कारण त्यावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणूनच मी त्याग करेल, असं गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रस अजित पवार (Ajit Pawar) गाटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी केलं आहे. या देशात आरक्षण, हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही.
लोकसभेच्या निवडणुकीत उगीचच अपप्रचार एवढा झाला, की लोकं त्याला बळी पडलेत. पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि आमच्यासारखे अनेक लोक जे संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत, ते असं होऊ देणार नाही. असं स्पष्ट वक्तव्य प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांनी केलंय. ते भंडाऱ्यात बोलत होते.
मराठ्यांना आरक्षण मिळालंचं पाहिजे, आमचं सरकार ठाम- प्रफुल्ल पटेल
मराठ्यांना आरक्षण मिळालंचं पाहिजे, यावर आमचे सरकार ठाम आहे. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाला, कायदा पण बनला असून दहा टक्के आरक्षण दिले आहे. आता ज्यांना तेही पटत नाही, ते विरोधाभास करतात. हेही तेवढेच सत्य आहे. काँग्रेस आणि इतर सर्वच पक्ष हे अनेक वर्ष सत्तेत राहिले आहेत. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही, तो फार जुना आहे. वर्षानुवर्षी या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आलेली आहे. ज्यांच्याकडून आता मागणी जोर धरू लागली आहे. त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात राहिलेले आहेत. किंबहुना अनेक पक्षात राहिलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिलं. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करायची. कारण ते स्वतः देऊ शकले नाही, मात्र आता चुका काढत बसायचं. आता निवडणुकीच्या काळामध्ये विरोध करायचा, हा एकच मुद्दा बनल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांवर केली.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार
महाराष्ट्रात तिन्ही पक्ष महायुती म्हणून काम करत आहेत आणि यशस्वीरीतीने या महाराष्ट्रमध्ये निवडणूकमध्ये सामोरे जाणार. महाराष्ट्रमध्ये आपले सरकार बनवणार, असं वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचारांचे सरदार असा आरोप केला होता. त्यावर शरद पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर देत अमित शहा यांना तडीपार असं म्हटलं होते. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांनी अधिक बोलण्याच मात्र टाळलं
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकं इकडे तिकडे जातात
बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटात घरवापसी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. बाबाजानी पूर्वीपासून आमचे सहकारी होते. आता विधानसभा निवडणूक आली की, विधानसभाच्या निवडणूक वेळी लोकं इकडे तिकडे जात असतात. बाबाजानी जे विधानपरिषदची सीटिंग जागा होती. त्यांना परत पाहिजे होती, आम्ही दुसऱ्यांना संधी देत होतो. हे वेगळ काही म्हणण्याच कारण नाही. आमच्याकडून सगळ्यांना शुभेच्छा आहे. आपली आपली प्रगती करण्याच्या अधिकार सर्वांना आहे, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी बाबाजानी दुर्राणीं हे शरद पवार गटात घरवापसी करीत असल्यावर बोलत होते.
हे ही वाचा