एक्स्प्लोर

NCP : अजितदादांचे आमदार परतीच्या वाटेवर? आमदारांवर बारीक लक्ष, पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करणार; अजित पवार गटाचा इशारा

Amol Mitkari Reply To Sharad Pawar : अजितदादांना कुणीही सोडून जाणार नाही, त्यामुळेच शरद पवारांनी नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याची टीका अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केली.

अकोला : अजितदादांसोबत गेलेले आमदार निधीवाटप झाल्यानंतर परत येतील, सर्वच आमदारांना पक्षबंदी नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केल्यानंतर आता त्यावर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शरद पवारांचं हे वक्तव्य केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे, आमच्या आमदारांवर बारीक लक्ष असून पक्षशिस्त मोडणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. 

अजित पवारांसोबत गेलेल्यापैकी सर्वांनाच आपल्या पक्षात प्रवेशबंदी नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं. अजित पवार गटातील अनेक आमदार लवकरच आपल्यासोबत येणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत. यावर अजित पवार गटानं प्रतुत्तर दिलंय.

शरद पवारांचं हे वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नसल्याने त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचं मिटकरी म्हणाले. आमच्या आमदारांवर आमचं बारीक लक्ष असून कुणी पक्षशिस्त मोडायचा प्रयत्न केला तर पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं. 

मिटकरींचा भाजपच्या प्रवीण दरेकरांना इशारा

दरम्यान, अमोल मिटकरींना आवरा असा सल्ला अजित पवारांना देणाऱ्या भाजप नेते प्रविण दरेकरांवर अमोल मिटकरींनी जोरदार प्रतिहल्ला केला. दरेकरांनीच आपलं तोंड आवरावं, माध्यमांचे कॅमेरे दिसले की दरेकर प्रसिद्धीसाठी असं बोलतात असा टोला मिटकरींनी त्यांना लगावला. अजित पवारांवर भाजपचं कुणी बोललं तर आमच्या तोंडाचा पट्टा आणखी वेगाने चालेल असा इशाराही मिटकरींनी दिला. युती धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीनेच घ्यायचा का? असा सवाल मिटकरींनी दरेकरांना केला. 

काय म्हणाले अमोल मिटकरी?  

- शरद पवारांचं हे वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी. 
- अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नाही. 
- त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केलीय. 
- आमच्या आमदारांवर आमचं बारीक लक्ष असून कुणी पक्षशिस्त मोडायचा प्रयत्न केला तर पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार. 
- दरेकरांनीच आपलं तोंड आवरावं. 
- माध्यमांचे कॅमेरे दिसले की दरेकर प्रसिद्धीसाठी असं बोलतात. 
- अजित पवारांवर भाजपचं कुणी बोललं तर आमच्या तोंडाचा पट्टा आणखी वेगाने चालेल. 
- युती धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीनेच घ्यायचा का?.

ही बातमी वाचा: 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget