Sharad Pawar : 'सवालही पैदा नही होता' म्हणणाऱ्या शरद पवारांनी शब्द फिरवला; अजित दादांकडील आमदारांबाबत मोठं वक्तव्य
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ अशी माहिती एबीपी माझाला शरद पवारांनी दिली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला (NCP) अपयश आले. त्यामुळे अजित पवारांसोबतचे बरेच नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांसोबतचे नेत्यांना घरवापसी करु वाटली तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आला होता. त्यावर 'सवालही पैदा नही होता', अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती . आता मात्र शरद पवारांनी शब्द फिरवला आहे. अजित दादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी असं नाही, अशी माहिती शरद पवारांनी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाला दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ अशी माहिती एबीपी माझाला शरद पवारांनी दिली आहे. तसेच अजित दादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही, असेही ते म्हणाले. तसेच अजित पवार गटातील आमदार आमच्यासोबत यायला इच्छुक आहे. अनेक आमदारांनी शरद पवारांची देखील भेट देखील घेतली आहे. पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वाटप पूर्ण झाल्यानंतर येऊ असं आमदारांकडून आश्वासन देण्यात आल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे.
शरद पवारांचे सूचक वक्तव्य
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश आले. त्यामुळे अजित पवारांसोबतचे बरेच नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांसोबतचे नेत्यांना घरवापसी करु वाटली तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर 'सवालही पैदा नही होता', अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती. आता मात्र शरद पवारांनी सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही असे म्हणत गुगली टाकली आहे. अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त होती. मात्र शरद पवारांवर टीका करणाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे इतरांचा विचार केला जाईल अशा प्रकारचे सूचक वक्तव्य करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीतील निराशानजक कामगिरीनंतर टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजितदादा गटातील (Ajit Pawar Camp) आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नव्या जोमाने उतरण्याच्या तयारीत असलेल्या अजित पवार यांच्या मनसुब्यांना धक्का बसू शकतो.
हे ही वाचा :