Dr Ambedkar Jayanti 2024: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, देशभरात उत्साहाचे वातावरण
Dr Ambedkar Jayanti 2024 : डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांची यंदा 134 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Background
Dr Ambedkar Jayanti 2024 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांची जयंती (Dr Ambedkar Jayanti 2024) दरवर्षी 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा संपूर्ण देश बाबासाहेबांची 134 वी जयंती साजरी केली जात आहे.
22 वर्षाच्या कलाकाराने रांगोळीच्या माध्यमातून केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
धुळे शहरातील 22 वर्षे राहुल अहिरे या कलाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रांगोळी साकारत बाबासाहेबांना अनोखी अभिवादन केले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर ही रांगोळी साकारण्यात आली असून तब्बल दोन हजार स्क्वेअर फुटवर ही रांगोळी काढण्यात आली आहे. राहुल अहिरे याला ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल तीन दिवस लागले असून साडेचार हजार किलो रांगोळी यात वापरण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांच्या संकल्पनेतून आणि काही आंबेडकरी तरुणांच्या सहकार्यातून ही रांगोळी राहुल अहिरे यांनी काढली आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी धुळेकर नागरिकांची गर्दी होऊ लागली असून सध्या ही रांगोळी चांगला चर्चेचा विषय ठरली आहे.
Ambedkar Jayanti 2024 : काही लोकं बाबासाहेबांना स्वीकारायला लागले, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला
Ambedkar Jayanti Live Update : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जनतेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज काही लोक संविधान वाचविण्याच्या गोष्टी करायला लागलेत, ते बाबासाहेबांना स्वीकारायला लागले असल्याचा संकेत असल्याचे म्हणत आंबेडकरांनी मविआला टोला लगावला आहे.






















