(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित दादांसारख्या परखड व्यक्तिमत्त्वाने असे तोंड लपवून जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखं : अंबादास दानवे
Ambadas Danve : अजित दादा यांच्या सरख्या परखड व्यक्तिमत्त्वाला जर तोंड लपवून जावे लागतं असेल तर हे वाईट आहे. हा प्रकार म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखा असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केलीय.
मुंबई : सत्तेत सामील होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतच्या बैठकीचे किस्से सांगितल्याचं म्हटलं जातंय. सत्तेत सामील होण्याआधी शाह यांच्यासोबत दहावेळा बैठका झाल्या. तसेच या बैठकीला जाताना ते मास्क आणि टोपी घालून जायचे, असंही खुद्द अजित पवार यांनी सांगितलं आहे. यावर आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका करत अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधला आहे. अजित दादा यांच्या सरख्या परखड व्यक्तिमत्त्वाला जर तोंड लपवून जावे लागतं असेल तर हे वाईट आहे. हा प्रकार म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखा असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केलीय.
नारायण राणे आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात, ते पाहावे लागेल
भाजप आतापर्यंत कायम कूटनीतीचे राजकारण करत आली आहे. त्यांची किती खालच्या स्तराची मानसिकता आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. कोर्टाने देशमुख यांच्यावर स्पष्ट भुमिका दिली आहे. दृष्टपणाचे हे वागणे भाजपचेच असल्याचेही अंबादास दानवे म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत आहे. अशातच जागावाटपात महायुती मध्ये वाद निर्माण झाल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली भुमिका ठरवत असतो आणि ते नेते ठरवत असतात. नारायण राणे यांना किती पक्ष किंमत देतो हे पाहावे. त्यांनी बाकी अजित दादा आणि आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात, ते पाहावे लागेल. असेही ते म्हणाले.
दरम्यान लव्ह जिहाद प्रकरणावरुन दानवे यांनी नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधलाय. माझे नितेश राणे यांना आव्हान आहे की असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई करा. राज्यात आणि देशात तुमचे सरकार आहे. असे असताना कारवाई होत नसेल तर याचा अर्थ म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देताय का? तुम्ही तुमच्या राज्यात यावर कारवाई करा, असेही दानवे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातमी
- मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
- विधानसभेसाठी शिंदेंनी कंबर कसली; 46 प्रभारी, 93 निरीक्षकांची नियुक्ती, किती जागांवर असणार लक्ष?
- धक्कादायक! दोन वर्षांच्या चिमुरडीसह आईने घेतली कृष्णा नदीत उडी, सातारा जिल्हा हादरला
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI