Amalaki Ekadashi | प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आवळ्याचे महत्व सांगणारी आमलकी एकादशी
वारकऱ्यांचे निसर्गाशी असलेले नातं दृढ करण्यासाठी आज आवळा वृक्षाच्या पूजनाला महत्व असते. याचसोबत आता ऋतू पालट होत असून थंडी जाऊन उन्हाळा सुरु होत असल्याने या एकादशीला रंगभरणी एकादशी असेही मानले जाते .
पंढरपूर : आज फाल्गुन शुद्ध अर्थात आमलकी एकादशी आहे, यालाच आवळ्याची एकादशीची म्हणाले जाते. विठ्ठल भक्तांनी निसर्गाचा सांग वाढवण्यासाठी या एकादशीचे खास महत्व वारकरी संप्रदायात मानले जाते. सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटात प्रतिकारशक्ती वाढवणारा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आवळ्याचे सेवन होय.
आवळ्याचे पूजन करण्याचे आवाहन भगवान विष्णूने राजा चित्रसेनाला केले होते. आजच्या दिवशी मी आवळ्याच्या झाडात असतो असे भगवान विष्णूंनी राजा चित्रसेनाला सांगितल्याने या एकादशीला आमलकी एकादशी असे नाव पडल्याची वारकरी संप्रदायात मान्यता आहे. वारकऱ्यांचे निसर्गाशी असलेले नातं दृढ करण्यासाठी आज आवळा वृक्षाच्या पूजनाला महत्व असते. याचसोबत आता ऋतू पालट होत असून थंडी जाऊन उन्हाळा सुरु होत असल्याने या एकादशीला रंगभरणी एकादशी असेही मानले जाते .
आज फाल्गुन शुद्ध अर्थात आमलकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे . रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाटील यांनी ही सेवा दिली आहे . या सजावटीसाठी झेंडू , शेवंती , आर्केड ऍथोरियम , केळीचे खुंट या सोबत १०० किलो द्राक्षांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजविण्यासाठी करण्यात आला आहे. सध्या आपल्या बागेत पिकलेली द्राक्षे देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक भाविक येत असतात मात्र नानासाहेब पाटील यांनी थेट द्राक्ष व फुलांच्या मदतीने आकर्षक सजावट केली आहे.
संबंधित बातम्या :