एक्स्प्लोर
कोपर्डी निकाल: दोषींना कठड्यात उभं करुन न्यायाधीशांनी विचारलं....
कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, येत्या 22 तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे.
![कोपर्डी निकाल: दोषींना कठड्यात उभं करुन न्यायाधीशांनी विचारलं.... All three accused in Kopardi rape and murder case found guilty, by Ahmednagar district sessions court कोपर्डी निकाल: दोषींना कठड्यात उभं करुन न्यायाधीशांनी विचारलं....](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/13025613/kopardi-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर: राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले आहेत.
मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे.
आता येत्या 22 तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे.
कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा
त्याआधी 21 नोव्हेंबरला दोन्ही पक्षाचे वकील शिक्षेवर युक्तीवाद करतील. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे.
तर आरोपींच्या वकिलांचा त्यांच्या अशिलांना कमीत कमी शिक्षेची मागणी करतील.
कोर्टात नेमकं काय झालं?
कोर्टात आज तीनही आरोपींवरील दोष सिद्ध झाले. सुरुवातीला न्यायाधीशांनी आरोपींना कठड्यात उभं केलं. तीनही आरोपींना नाव विचारुन, त्यांचं वय विचारलं. मग न्यायालयाने तिघांवर ठेवण्यात आलेले आरोप त्यांना वाचून दाखवले.
तिघांवर बलत्कार, कटकारस्थान आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर तिघांवरील दोष सिद्ध करण्यात आले.
कलम 120 ए, 376 (बलात्कारा) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत.
संबंधित बातम्या
कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)