मराठा आरक्षणप्रश्नी सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय बैठक; तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न, काय होणार?
मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे.
Maharashtra Politics: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) आज सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. शरद पवार (Sharad Pawar), अशोक चव्हाण (Ashok Chavan), अंबादास दानवे (Ambadas Danve), उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था टिकवण्याकरता सर्वपक्षीयांचा सहयोग आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याकरता सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींनी आवाहन करणं गरजेचं असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.
उद्धव ठाकरेंचीच भूमिका दानवे बैठकीत मांडणार?
मराठा आरक्षणासंदर्भात बोललेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नात बरोबर काढण्यासाठी त्यासोबतच राज्य शांतता सुव्यवस्था टिकवण्याकरिता सर्वपक्षी बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं त्यासोबतच केंद्रातील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आणि केंद्रीय कॅबिनेटसमोर या संदर्भात चर्चा करावी आणण्याच्या आधी राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी आणि त्यानंतर राज्यातील सर्व खासदारांनी राजीनामे द्यावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्यानंतर सर्व पक्षीय बैठकीमध्येसुद्धा ठाकरे गट पक्षाच्या वतीनंही सर्वपक्षीय बैठकीत भूमिका समोर ठेवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सर्वपक्षीय बैठकीत काय होणार?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलवलेल्या सर्व पक्षीय बैठकीत आरक्षणाबाबत विविध पक्षांची आरक्षणाबाबत मतं जाणून घेतली जाणार
- निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने सादर केलेला अहवाल सर्व पक्षीय बैठकित मांडून त्यावर सर्व पक्षीय नेत्यांशी बैठकित चर्चा करणार
- मराठा आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मिळावं, यासाठी अन्य काही कायदेशीर उपाय योजना करणं गरजेचं आहे का? याबाबत निमंत्रीत सर्व पक्षांच्या नेत्यांकडून माहिती घेणार
- तसेच सर्वच पक्षांकडून राज्यात उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याबाबत राज्य सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले जाणार