एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातींचे पुजारी नेमणार
अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारीपदासाठी 113 अर्ज आले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहेत. देवस्थान समितीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारीपदासाठी 113 अर्ज आले आहेत. त्यापैकी सहा अर्ज हे महिला पुजाऱ्यांचे असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. मंदिरात कामकाजासाठी 55 पुजाऱ्यांची गरज आहे.
अर्जदार पुजाऱ्यांच्या मुलाखतींना मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. सध्या मंदिरात असणाऱ्या एकाही पुजाऱ्याने अर्ज केलेला नाही.
100 वर्षांपूर्वी मंदिरांमध्ये सर्व जातींचे पुजारी असावे आणि या पुजाऱ्यांना धार्मिक शिक्षण मिळावं, यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वैदीक स्कूलची स्थापना केली होती. आता मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमले जात असल्याने कोल्हापूरकरांनी समाधान व्यक्त केलं आहे.
दुसरीकडे, अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप पुजारी हटाव कृती समितीनं केला आहे. पगारी पुजारी नेमण्याच्या मुलाखती झाल्याच तर त्या उधळून लावण्याचा इशाराही कृती समितीनं दिला आहे.
करवीर निवासिनी अंबाबाईला गेल्यावर्षी श्री पूजक अजित ठाणेकर यांनी घागरा चोळी नेसवली होती. याविरोधात कोल्हापुरात मोठं आंदोलन सुरु झालं आणि मंदिरातील पुजारी हटाव अशी मागणी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंढरपूर, शिर्डी मंदिराच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement