एक्स्प्लोर

अक्षय शिंदेच्या बॉडीचा एक्स-रे काढणार, जे.जे. रुग्णालयातील तीन डॉक्टरांचं पॅनल पोस्टमार्टेम करणार

अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचे  व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करण्यात येणार आहे.  पोस्टमार्टम झाल्यानंतर  अक्षय शिंदेचे शव त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल.

ठाणे बदलापूरमधील दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील (Badlapur School Abuse Case)  आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde)   याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.  अक्षय शिंदेच्या मृतदेहावर जेजे रुग्णालयात (J. J. Hospital)  शवविच्छेदन करण्यात येणार  आहे. परंतु शवविच्छेदनापूर्वी (Postmortem) अक्षयच्या बॉडीचा एक्सरे करण्यात येणार आहे.   शवविच्छेदन झाल्यावर कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह  देण्यात येणार आहे. कळवा रूग्णालयात न्यायाधीशांच्या उपस्थितीत  पंचनामा झाला होता.  

जे जे रुग्णालयामध्ये आरोपी अक्षय शिंदेचं   पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.  परंतु पोस्टमार्ट करण्यापूर्वी अक्षयच्या बॉडीचा एक्सरे काढण्यात येणार आहे. त्यानंतर तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत अक्षयचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचे  व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करण्यात येणार आहे.   पोस्टमार्टम झाल्यानंतर  अक्षय शिंदेचे शव त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल.

पोस्टमार्टमचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार

जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या,  मुंबई पोलिसांनी अक्षय शिंदेचे शव हे जेजे रुग्णालयात आणण्यात आले आहे. आम्हाला पेपर मिळताच आम्ही पोस्टमार्टम सुरू करणार आहे. पोस्टमार्टम करताना तीन डॉक्टर उपस्थित असतात. या केसमध्ये देखील तीन डॉक्टर उपस्थित असणार आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसार पोस्टमार्टमचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार आहे. त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.

नेमकं काय घडले?

अक्षय याला दुसऱ्या एका गुन्ह्याप्रकरणी पोलिस तळोजा कारागृहातून पोलिस वाहनामधून घेऊन येत असताना त्याने एका पोलिस अधिकाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय याचा मृत्यू झाला. अक्षयने झाडलेल्या गोळीने एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे.  त्यानंतर  त्याला कळवा रुग्णालयात आणले होते. दरम्यान तब्बल 12 तासानंतर  पंचनामा करण्यात आला यावेळी न्यायाधीश उपस्थित होते.  

अक्षय शिंदेने फायर केलेली गोळी निलेश मोरेच्या पायातून आरपार

अक्षय शिंदेने केलेल्या फायरिंगमध्ये गोळीही निलेश मोरे यांच्या पायातून आरपार निघून गेली.  मात्र या घटनेनंतर गाडीतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला.  याघटनेत अक्षयच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी 6.25 ला गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर 6.35  वाजता तीन जखमी आणि अक्षयचा मृतदेह घेऊन पोलिस  कळवा रुग्णालयात आले. कळवा रुग्णालयात निलेश मोरे यांना झालेली दुखापत लक्षात घेता त्याच्यासह दोघांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती कळवा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. 

हे ही वाचा :

आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही; एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदेंनी सांगितला व्हॅनमधील 45 मिनिटाचा थरार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare : अक्षय शिंदेनं पिस्तुलाचं लॉक कसं काढलं? एन्काऊंटर प्रकरणी अंधारेंचे सवालJalna Manoj Jarange Maratha Protest : वडीगोद्री गावातून प्रवेश  देत नसल्याने मराठा आंदोलक रस्त्यावरAkshay Shinde Encounter  : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडीकडून होणारAjit Pawar EXCLUSIVE :  अजित पवारांनी लाडकी बहीण योजना हायजॅक केली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
Rain update : पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
Akshay Shinde Encounter: कुछ तो गडबड है दया... बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर की कट? सीआयडी करणार तपास
कुछ तो गडबड है दया... बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर की कट? सीआयडी करणार तपास
Embed widget