एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला श्रीमुखात, रणजीत पाटलांनी मौन सोडलं
अकोला : वडिलांनी महाविद्यालयीन कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी अखेर गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मौन सोडलं आहे. पोलीस तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार आपल्या वडिलांवर कारवाई केली जाईल, असं रणजीत पाटील यांनी सांगितलं.
पोलीस तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार आपल्या वडिलांवर कारवाई केली जाईल, यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नसल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. दरवर्षी अॅडमिशनच्या वेळी हे वाद होतात, वडील तो कारभार पाहतात, त्याच्याशी माझा संबंध नसल्याचं रणजीत पाटील यांनी सांगितलं.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आपल्या आणि संजय देशमुखांच्या संस्थेत वाद असल्याचं रणजीत पाटलांनी मान्य केलं. दरम्यान, पोलिस तपासात कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि कायदा त्याचं काम करेल, असं रणजित पाटील म्हणाले.
मुर्तिजापूर तालूक्यातील घुंगशी हे रणजीत पाटील यांचं मूळ गाव आहे. वडील घुंगशी येथेच शेती करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी कॉलेज कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील भाऊसाहेब देशमुख या कॉलेजमध्ये हा प्रकार घडला.
देशमुख कुटुंबीयांच्या संस्थेचं हे कॉलेज आहे. रणजीत पाटलांच्या कुटुंबीयांमध्ये आणि देशमुख कुटुंबात 2010 पासून वाद सुरु आहे. मंगरुळतांबे गावात रणजीत पाटलांचं कॉलेज आहे. पण या भाऊसाहेब देशमुख कॉलेजमुळे विद्यार्थी रणजीत पाटलांच्या कॉलेजमध्ये जात नाहीत, असं बोललं जातं.
गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांची कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण
दोन्ही कुटुंबांमध्ये 2010 पासून कायदेशीर लढाई सुरु आहे. रणजीत पाटलांचे वडील आणि दोन वेळा आमदार राहिलेले विठ्ठल पाटील यांनी 2013 साली या कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती. या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली. मात्र देशमुख कुटुंबीयांनी पुन्हा मान्यता मिळवली. आता पुन्हा या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे. पण तरीही कॉलेज सुरु असल्यामुळे विठ्ठल पाटील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन कॉलेजमध्ये गेले. यावेळी कॉलेजच्या शिपायाला त्यांनी मारहाण केली. शिवाय शिवीगाळही केली. मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी विठ्ठल पाटील यांच्याविरोधात मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र दोन वेळा आमदार राहिलेल्या विठ्ठल पाटील यांना कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण करणं शोभतं का, असा सवाल केला जात आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement