एक्स्प्लोर

Akola : अकोल्यात रेल्वेसह भाजप खासदाराचं घरं बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिस दलात खळबळ

 अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे (Akola Purna Passenger) आणि भाजपचे खासदाराचं (BJP MP Sanjay Dhotre) घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Akola News Updates :  अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे (Akola Purna Passenger) आणि अकोल्याचे भाजपचे खासदाराचं (BJP MP Sanjay Dhotre) घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाने (Mumbai Police) अकोला पोलिसांना (Akola Police) दिली.  अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच अकोला पोलीस दलात खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांनी काल मंगळवारी रात्री 10 वाजून 40  मिनिटांपर्यत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. यासोबतच रेल्वेतील प्रवाशांची तपासणी झाली. तर खासदार संजय धोत्रेंच्या रामनगर भागातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला.
 
'बाँबच्या निनावी फोनने अकोल्यात खळबळ : 
 
काल 26 जुलैला अकोला रेल्वे पोलिसांना अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर (रेल्वे क्रमांक 17683) या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचा आणि अकोल्याचे भाजपचे खासदार यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याची धमकीचा कॉल मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला आला. त्यानंतर अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर हजेरी लावली. अन् रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी असलेली अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी सुरु केली. या दरम्यान, रेल्वेच्या प्रवाशांची कसून चौकशीसह तपासणी झाली. या घटनेने काल अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. काल मंगळवारी रात्री 10 वाजतापासून रेल्वेची तपासणी सुरु झाली अन् तब्बल अर्धा तास ही शोध मोहीम चालली. श्वान पथकाद्वारेही या तपासणीला सुरुवात झाली. बघता बघता सर्व रेल्वेच्या डब्यांची तपासणी झाली. 
 
पोलिसांना नाही आढळले काहीच आक्षेपार्ह : 
 
यादरम्यान रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांचे फोटो काढण्यात आले. झडतीदरम्यान डब्यांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू, संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही. त्यानंतर रेल्वे आपल्या मार्गाने रवाना झाली. यादरम्यान धमकी देण्यात आलेला फोन फसवणूक करण्यासाठी आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी अकोला जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रमुख अर्चना गडवे आणि मुंबई पोलिसांद्वारे या बॉम्ब कॉलचा तपास सुरु आहे.
 
अकोला पोलिसांची झाली धावपळ : 
 
दरम्यान, अकोल्याचे भाजपचे खासदार यांचं घरंही बॉम्बने उडवून देण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या घराशेजारील परिसराची तपासणी झाली. रात्री त्यांच्या रामनगरस्थित निवासस्थानी पोलीस बंदोबस वाढवण्यात आला होता. तर रेल्वे पोलिसांनीही त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. आता अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वेमध्ये बॉम्ब अन् खासदारांचं घर उडून देण्यात येईल, या संदर्भात कुणी फोनवर माहीती दिली अन् फोन कुठून आला, याचा तपासही पोलीस करीत आहे. परंतु कालच्या या घटनेमुळे अकोला पोलिसांची प्रचंड धावपळ झाली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget