Ajit Pawar : तर मीच पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन! अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना कडक तंबी
Ajit Pawar : मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सोशल मीडियासाठीची शस्त्र सज्ज करण्याची वेळ आली असल्याचे अजित पवार म्हणाले.
मुंबई : सोशल मीडिया 'सोसेल' तेवढा वापरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया शिबिरात बोलताना सोशल मीडिया वापरताना काय काळजी घ्यावी, याची नियमावली वजा सूचना कार्यकर्त्यांना केल्या. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सोशल मीडियासाठीची शस्त्र सज्ज करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
तर पोलिसांना टायर मध्ये घालायला लावेल
ते पुढे म्हणाले की, कुणाच्याही खासगी आयुष्याबाबत बोलायचं नाही. तसेच कोणत्याही महिलेवर टीका करायची नाही. विनाकारण कुणाला ट्रोल करु नका. जर आपल्याला कूणी काही बोलत असेल, तर रीतसर पोलीस तक्रार करा. कुणावरही कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली, तर पक्षाकडून मदत केली जाईल. पक्ष म्हणून मी पाठीशी कायम उभा राहील. जर पोलिसांनी सांगितल की आपल्याच कार्यकर्त्याची चूक आहे, तर पोलिसांना टायर मध्ये घालायला लावेन. आपल्या पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्व मदत पक्ष करेल.वैद्यकीयअडचणी देखील सोडवल्या जातील.
अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सक्त सूचना
अजित पवार म्हणाले की, आम्ही महायुतीमध्ये असलो तरी, फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा आपली आहे. सेक्युलर आपला विचार आहे. फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आपण कधीच सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू माता जिजाऊचं आहेत, ही माझी नाही तर आमच्या पक्षाची भूमिका आहे.
इतर महत्वाच्या बातम्या