Ajit Pawar : पेट्रोल-डिझेलसाठी 'वन नेशन वन टॅक्स' लावलं तरी आमची तयारी : अजित पवार
Petrol - Diesel Rate : वाढत्या महागाईबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेलसाठी वन नेशन वन टॅक्स लावण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
Maharashtra News : देशात एकीकडे महागाई (Inflation) वाढताना पाहायला मिळत आहे. अगदी लिंबूपासून ते पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Rate) दराने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार (Central Govt.) आणि राज्य सरकार (Maharashtra Govt.) महागाईवरून एकमेकांकडे बोट दाखवताना दिसत आहेत. वाढत्या महागाईबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पेट्रोल-डिझेलसाठी वन नेशन वन टॅक्स लावण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी गॅस दर कमी करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतल्याचीही माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अलिकडेच पार पडलेल्या बैठकीत महागाईचं कारण राज्य सरकार असल्याचं म्हटलं होतं. पेट्रोल-डिझेलचे दर राज्य सरकारच्या करामुळे वाढल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. तसेच राज्यांना दर कमी करण्याचंही आवाहन केलं. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेट्रोल-डिझेलसाठी वन नेशन वन टॅक्स सुरु करा, आमची तयारी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया दिली होती. केंद्र सरकारने आधी राज्यांचे जीएसटीची 26 हजार कोटींची थकबाकी द्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.
अजित पवार यांनी यावेळी म्हटलं की, 'आपल्या देशातही महागाई आहे. आपल्या शेजारील देशातही महागाई आहे. आपल्या शेजारील श्रीलंका आणि पाकिस्तान हे देश बघा. महागाईमुळे तिथली परिस्थिती कठीण आहे. लोक रस्त्यावर आले आहेत. पाकिस्तानमध्ये सत्तापालट झाला. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलसाठी पेट्रोल-डिझेलसाठी वन नेशन वन टॅक्स सुरु करावा, आमची तयारी आहे.'
महत्त्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : जशास तसे उत्तर देणं हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव, संजय राऊतांचा इशारा
- TATA Group : आता टाटा बनवणार चिप, सेमीकंडक्टर व्यवसायात पदार्पण करण्याची तयारी
- Shubman Gill : शुभमन गिलची एलॉन मस्ककडे स्विगी विकत घेण्याची विनंती, जाणून घ्या काय आहे कारण?
- Security Alert : 'या' अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' काम