एक्स्प्लोर
मोदींनी लोकांना काय मोहिनी घातलीय तेच कळत नाही: अजित पवार
बारामती: 'मोदींनी काय मोहीनी घातली आहे तेच कळत नाही, त्यांनी काहीही केलं तरी लोकं म्हणतात, नाही नाही... याच्यामागे चांगलाच हेतू असला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा मोदी फक्त स्वतःचं ब्रँडिंग करत आहेत,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. खादी ग्रामोद्योगच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये गांधीजींप्रमाणे मोदींनी स्वतःचा फोटो छापला आहे. त्यावर अजित पवारांनी टीका केली.
'भाजपा सरकारच्या काळात मोदींचे मार्केटींग करण्याचा फंडा अवलंबला जात आहे. कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीत पंतप्रधान मोदींचाच फोटो वापरला जातो. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणं-घेणं नाही. फक्त स्वत:चं ब्रँडिंग करुन घेण्यात ते मश्गुल आहेत.' अशी टीका अजित पवारांनी केली.
'मोदी हे देशभरात आपलं आणि भाजपचं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्तेत येण्यापूर्वी हेच लोक नथुराम गोडसेंच्या जयंतीसाठी प्रयत्न करत होते.' असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement