कंत्राटं मिळवायला माझ्याकडे येऊ नका, अनेकजण कंत्राट घेतात आणि इतरांना 10 टक्क्यांनी विकतात; अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं
बडी कंत्राटं मिळवायला माझ्याकडे येऊ नका असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. अनेकजण कंत्राट घेऊन 10 टक्क्यांनी इतरांना विकतात, हे सहन होणार नाही, असेही ते म्हणाले.
Ajit Pawar : बडी कंत्राटं मिळवायला माझ्याकडे येऊ नका असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. अनेकजण कंत्राट घेऊन 10 टक्क्यांनी इतरांना विकतात, हे सहन होणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खडसावलं. लयं मोठं कंत्राट मिळवण्याच्या आशेने माझ्याकडे आलात तर एक्साईजला सांगून लांब कुठेतरी टाकेन असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दम भरला.
सध्या अनेकजण चुकलं चुकलं म्हणून येत आहेत
माझ्याकडे उत्पादन शुल्क खात आहे. उगाच काहीतरी चुकीची कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका, नाहीतर एक्साइजला सांगेल त्याला लांब कुठे तरी टाका म्हणून असेही अजित पवार म्हणाले. पक्षात कुणालाही घेतलं जाणार नाही. सध्या अनेकजण चुकलं चुकलं म्हणून येत आहेत. मात्र, कुणालाही घेणार नाही. त्यांना देखील शिस्त म्हणजे काय? हे कळायला हवं असेही अजित पवार म्हणाले.
छगन भुजबळ हे परवानगी घेऊन मुंबईला गेलेत
छगन भुजबळ यांनी मुंबई मॅरेथॉन सुरु केली आहे, त्यामुळे ते परवानगी घेऊन मुंबईला गेल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उद्या परवा मुंबईबाबत बैठक होईल. नवाब मलिक देखील सोबत असतील असे ते म्हणाले. एक सिने स्टार सैफ अली खान याच्या घरात चोर शिरला म्हणून कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असा प्रचार विरोधकांनी सुरू केला. ८ महिन्यापूर्वी तो बांगलादेश वरून आला होता. तो एका डक मधून आत शिरला. त्याला माहिती नव्हतं की कोणत्या अभिनेत्याच हे घर आहे का?
वैद्यकीय सहायता कक्ष तयार करणार, प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यदूत नेमावेत
आपण दोन नवीन सेल तयार करत आहोत. एक म्हणजे वैद्यकीय सहायता कक्ष आपण तयार करत आहोत. प्रत्येक मंत्री कार्यालयात हा सेल असेल. एक अप्लिकेशन आपण तयार करत आहोत. पुढील महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य दूत नेमावेत अशा सूचना अजित पवार यांनी केल्या. दुसरा सेल आपण तयार करत आहोत तो म्हणजे वचनपूर्ती कक्ष. पक्ष कार्यालय तसेच प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात तो सेल तयार करावा असे अजित पवार यावेळी म्हणाले. येत्या गणेशोत्सवापर्यंत एक तरी वचनपूर्ती व्हायला हवी, असा सूचना अजित पवार यांनी शिर्डीच्या शिबिरात दिल्या.
महत्वाच्या बातम्या: