एक्स्प्लोर

Amol mitkari : प्रकाशझोतात राहण्यासाठी काहींची कायम कोल्हेकुई; अमोल मिटकरींचा खासदार अमोल कोल्हेंना टोला 

खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचा आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतलाय. प्रकाशझोतात राहण्यासाठी काहींची कायम कोल्हेकुई सुरू रहात असल्याचा टोला अमोल मिटकरींनी कोल्हेंना लगावलाय.

Akola News अकोला :  खासदार  अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे आमदार  अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) चांगलाच समाचार घेतलाय. प्रकाशझोतात राहण्यासाठी काहींची कायम 'कोल्हेकुई' सुरू रहात असल्याचा टोला अमोल मिटकरींनी कोल्हेंना लगावलाय. अजितदादांनी (Ajit Pawar) सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडल्यानेच काहींच्या पोटात दुखत असल्याचं ते म्हणालेय. दरम्यान, अमोल कोल्हेंनी आपली खासदारकी सांभाळावी, त्यांनी महाराष्ट्र सरकार अन् अजित पवार काय करतायेत याची काळजी करू नये, असा टोलाही मिटकरींनी खासदार अमोल कोल्हेंना लगावलाय. 

कलाकार हा रंगमंचावरच शोभून दिसतो- अमोल मिटकरी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो सर्व सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडला ते पाहून काही चेले चपाटे कोल्हेकुई करू लागले आहेत. मात्र आम्हाला सल्ला देण्यापेक्षा त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,  आपण स्वत: इथवर कोणाच्या जीवावर पोहचलो आहे. कोणी आपल्याला पक्षात आणून मान सन्मान दिला, यांचे आत्मचिंतन त्यांनी केलं पाहजेल. उगाच केव्हाही उठून वाट्टेल ते बोलायचं आणि प्रकाशझोतात राहायचं असा प्रयत्न काही लोक करत आहेत. कलाकार हा रंगमंचावरच शोभून दिसतो. ग्राउंडवर उतरून अजितदादा काम करणारे आहेत. दुसरीकडे तुमच्यात शिवरायांबद्दल इतकीच आत्मीयता होती तर विशाळगड सारखे हिंसाचाराचे प्रकरण विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावात जी घटना घडली, त्या ठिकाणी जाण्याचं औदार्य आपण का दाखवलं नाही? असा सवाल आमदार अमोल मिटकरींनी खासदार अमोल कोल्हेंना केला आहे.

जनतेते उतरून काम करायचे असतात, ते अजितदादा कायम करत असतात. त्यामुळे कोल्हेकुई करणाऱ्या कुणीही नेत्याने महायुती बद्दल बोलावं आणि तोंडसुख घेऊ नये, असेही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले. आधीच आपली चादर फाटली आहे. ती अधिक फाटू नये याची काळजी घेण्याचा सल्ला ही त्यांनी खासदार अमोल कोल्हेंना दिला आहे. ते अकोला येथे बोलत होते.

अकोट विधानसभा लढवणार का?

अकोला जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यात अकोला पश्चिम, बाळापूर आणि अकोटचा समावेश आहे. पक्षाने संधी दिल्यास अकोटमधून विधानसभा लढण्याची तयारी आहे. मी लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget