अजितदादांनी 2025 आषाढीला मुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करावी, अमोल मिटकरींचं विठ्ठलाला साकडं
Amol mitkari : अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 2025 मधील आषाढी एकादशीला शासकीय महापूजा करावी, असं साकडं विठ्ठलाला घातल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
![अजितदादांनी 2025 आषाढीला मुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करावी, अमोल मिटकरींचं विठ्ठलाला साकडं Amol mitkari says ajit pawar take oth as maharshtra cm next year ashadi ekadashi 2025 अजितदादांनी 2025 आषाढीला मुख्यमंत्री म्हणून शासकीय महापूजा करावी, अमोल मिटकरींचं विठ्ठलाला साकडं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/72a10538aaebfe0acf24d6015fa0050a1720604302623736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amol mitkari : अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 2025 मधील आषाढी एकादशीला शासकीय महापूजा करावी, असं साकडं विठ्ठलाला घातल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होतेय. त्यासाआठी आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
अजितदादांना प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत येण्याची साद घालण्यावरही मिटकरींनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर हे 'शाहू-फुले-आ़बोडकरां'ची भूमिका मांडणारे आहेत. त्यांच्या अजितदादांबद्दलच्या भूमिकेचे स्वागत त्यांनी केलंय. सध्या आंबेडकरांनी महायुतीच्या माध्यमातून अजितदादांसोबत यावं असं आवाहन त्यांनी आंबेडकरांना केलंय.
दरम्यान, संघाच्या 'साप्ताहिक विवेक'मध्ये लोकसभा पराभवाचे खापर अजितदादांवर फोडल्यावरही त्यांनी यावर भाजपनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीय. दरम्यान, विधानसभेसाठी आमदार मिटकरींनी अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावर दावा केलाय. पक्षाने संधी दिल्यास अकोटमधून लढण्याची तयारी असल्याचं ते म्हणालेय. सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहेय. 2014 आणि 2019 मध्ये येथून भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले आहेत.
'साप्ताहिक विवेक'मधील लेखाबद्दल काय म्हणाले मिटकरी ?
विवेकमध्ये भाजपचा कार्यकर्ता हा खचलेला नाही, मात्र तो संभ्रमात कसा आहे, हे दाखवलंय. यात त्यांनी राष्ट्रवादीवरही टीका केलीय. विवेक हे साप्ताहिक किती लोकांना माहित आहे. त्याशिवाय यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी. काय लिहावं हा त्यांचा अधिकार. परंतू, महायुतीचा धर्म भाजपने पाळावा. ते याबाबत अधिकृतपणे भूमिका का मांडत नाहीत? लेखणी आम्हालाही चालवता येते, परंतू पक्षानं काही बंधनं घातल्याने बोलता येत नाहीय. आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करतोय, हाच धर्म त्यांनीही पाळावा, असे अमोल मिटकरी म्हणाले.
अकोट विधानसभा लढवणार का ?
अकोला जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यात अकोला पश्चिम, बाळापूर आणि अकोटचा समावेश आहे. पक्षाने संधी दिल्यास अकोटमधून विधानसभा लढण्याची तयारी आहे. मी लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)