एक्स्प्लोर

Ajit Pawar : 'मला आपलं म्हणा...', अजितदादांना अनोख्या शुभेच्छा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची जाहिरात चर्चेत

Ajit Pawar Birthday : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. या शुभेच्छांमध्ये एका जाहिरातीची खास चर्चा सुरु आहे. 

मुंबई : आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. काहींनी टीव्ही माध्यमांवर जाहिरात दिल्या आहेत, अनेकांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्यात तर काहींनी वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात देऊन शुभेच्छा दिल्यात. या शुभेच्छांमध्ये एका जाहिरातीची खास चर्चा सुरु आहे. 

अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने त्यांची वर्तमानपत्रातून जाहिर माफी मागत शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत घेतलेल्या पहाटेंच्या शपथविधीनंतर अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.  त्यानंतर अजित दादांनी देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. घोषणाबाजीनंतर आजपर्यंत देशमुख यांच्याशी अजित पवार बोलले नाहीत. 

नितिन देशमुख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत वपवार कुटुंबियांचे कट्टर समर्थक ओळखले जातात.  पवारांविरुद्ध बोलणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांना देशमुख नेहमीच अंगावर घेत आले आहेत.  पहाटेच्या शपथविधीनंतर नितिन देशमुख यांनी वाय बी चव्हाण येथे अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी  केली होती. 

Ajit Pawar : फ्लेक्सबाजीच्या प्रश्नावर अजितदादांचा संताप, म्हणाले, 'फ्लेक्स लावायला मी सांगितलं का?'

 नितिन देशमुख यांनी आज 'मला माफी, हेच तुमचं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट', अशा आशयाची  जाहिरात वर्तमानपत्रात दिली आहे.  दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा… तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा. 23 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या. दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली.  दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे.  पण दादा, आता सहन होत नाही..संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या..एवढीच माफक अपेक्षा असं  नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे. 

अजित पवारांनी केलं होतं आवाहन
राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget