एक्स्प्लोर

Ajit Pawar : मोठी बातमी! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार, अजित पवारांची मोठी घोषणा

Ajit Pawar : महाराष्ट्रातील माय माऊलांना वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

Ajit Pawar : महाराष्ट्रातील माय माऊलांना वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. त्यामुळं आता महिलांना चुलीपुढे धूर फुकण्याची गरज नसल्याचे अजित पवार म्हणाले. मोहळमध्ये (Mohol) आयोजीत करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते. आता एकदम पारदर्शक कारभार आहे. भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही अजित पावर म्हणाले. 

गरीबांच्या मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार  आहे. तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आणले कोठून. तर आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न 42 लाख कोटी आहे. त्यातून अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा सादर केला होता असेही अजित पवार म्हणाले. एकूण जीएसटीच्या 16 टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. राज्याला विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी योजना येत असतात असे अजित पवार म्हणाले. 

आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके 

आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले.  वारकरी, ज्येष्ठ नागरिक , मुस्लिम , मातंग सर्वांसाठी ही योजना असल्याचे अजित पवार म्हणाले. मराठा, ओबीसी, आदिवासी या सर्वांच्या महामंडळाला पैसे दिले आहेत. लोकसभेला मुस्लिम समाजाने आमच्याकडे पाठ फिरवूनही, मुस्लिम समाजासाठी योजना आणून त्यांना 1 हजार कोटी दिले असून कर्जाची हमी सरकारने घेतल्याचे अजित पवार म्हणाले. 

विरोधक केवळ आमच्यावर टीका करतात, ते दुसरं काही करु शकत नाहीत

आता सर्व पाणी उपसण्याची योजना सोलरवर घेत असल्यामुळे  शेतकऱ्यांवर लाईट बिल भरण्याचा बोजा येणार नाही. अशा योजना चांगल्या पद्धतीने चालवू असे अजित पवार म्हणाले. यासाठी या बजेटमध्ये हे वीज बिल सोलर पॅनलमध्ये घेवून शेतकऱ्यांना फक्त पाणीपट्टी भरावी लागेल. विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडूण आणा असं आवाहन देखील अजित पवार यांनी जनतेला केलं. केवळ एक वर्ष कळ काढा पुढच्या वर्षीपासून सर्व शेतकऱ्यांना रात्री नाही तर दिवसा देखील शेतीला वीज मिळू शकेल असे अजित पवार म्हणाले.  
सध्या साडेनऊ हजार मीटर मेगा वॅट वीज सोलर वर बनवत आहे. विरोधक केवळ आमच्यावर टीका करत आहेत. ते दुसरं काही करु शकत नाहीत. कुणी टीका केल्यानं आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या नवा दर काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 8 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP MajhaMVA Leaders meets CM Fadanavis : विधानसभा उपाध्यक्ष , विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :9 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Maharashtra cabinet: वर्षा बंगल्यावर रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं, एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच भेटले, शिवसेनेला काय मिळणार?
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस दोघेच वर्षा बंगल्यावर भेटले, रात्री उशीरापर्यंत खातेवाटपची खलबतं
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
Embed widget