Ajit Pawar : अजित पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा आवाहन, कुणी काही सांगत असेल तर..
Ajit Pawar : शरद पवारांच्या नावाने राजकारण फिरतय, साहेबांनी काहीतरी केलं म्हणून त्यांच्या नावाने राजकारण फिरतेय हे लक्षात घेतलं पाहिजे
Ajit Pawar : एसटी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा मी सांगितलं तुम्हाला पगार चांगला देण्याचा आपण प्रयत्न करू, आमच्या मुलाबाळांना शाळेत जाताना अडचणी येत आहेत, त्यांना गिरणी कामगारांचे उदाहरण मी दिलंय, त्यांचा पगार वेळेत याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, कुणी काही सांगत असेल त्याकडे लक्ष देऊ नका, कुणी वेगळ्या प्रवाहात जात असतील तर त्यांना मुख्य प्रवाहात आणूया, असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी पुन्हा आवाहन केलंय
शरद पवारांच्या नावाने राजकारण फिरतंय..
शरद पवारांच्या नावाने राजकारण फिरतंय, साहेबांनी काहीतरी केलं म्हणून उगाच त्यांच्या नावाने राजकारण फिरतेय हे लक्षात घेतलं पाहिजे, शरद पवारांनी कधी जाती पातीचं राजकारण केलं नाही, सर्व धर्म समभाव साहेबांनी केलं, उगाच बदनामी करायची, आपण काय केलं, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
हे तीन विचारांचे सरकार
गेल्या 2 वर्षात अनेक कार्यक्रम थांबलेत, मी सकाळी 6:30 वाजता कार्यक्रम आलोय, बारामतीकरांना सकाळच्या कार्यक्रमाची सवय झालीय, हे तीन विचारांचे सरकार आलं आहे, काही जण म्हणत होते हे सरकार पडणार, मात्र आज अडीच वर्षे झालेत, उद्धव ठाकरेंनी खुप चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय.
दूध संघ मुद्द्याबाबत..
शरद पवार साहेब एवढे चांगले आहेत तर पुतण्या थोडा तरी बरा असेल, अस असताना इंदापूरकरानी मला खासदारकीला मोठं मताधिक्य दिल होत. आज दूध 35 रुपये लिटर आहे, दूधाचा व्यवसाय बदलाय आहे, लाकडी लिबोडी पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहेत, ते मंजूर आधीपासून आहेत, कुणाच्या तोंडातला घास काढून घ्यायचा नाही. असे अजित पवार म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही
पक्ष प्रवेशामुळे जुन्या कार्यकर्त्यांना असं वाटेल आमच्याकडे दुर्लक्ष होईल का? मात्र त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही याची शाश्वती देतो असे अजित पवार यावेळी म्हणाले.
आमदारांना दिल्या जाणाऱ्या घरांवरून अजित पवार म्हणाले...
आमदारांना घर देणार ज्या बातम्या दिल्या, मात्र फुकट दिली जाणार नाहीत, जर एवढा वाद होणार असेल तर नको ते घरं, आहे ते बर आहे, ध चा मा करून वातावरण गढूळ केलं जातंय.