एक्स्प्लोर

 Ajit Pawar: अजित पवारांचे आजचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द, एमजीएम रुग्णालयातून पुण्याला न जाता देवगिरी बंगल्यावर गेले अजित पवार

 Ajit Pawar: पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याला देखील अजित पवार गेले नाहीत.  त्याआधी वडकी, दिवे, भिवरी, बनपुरी या गावांमध्ये त्यांचे  कार्यक्रम होणार होते.

 Ajit Pawar: कधी बुक्की तर कधी डोळा मारणारे दादा आता मविआला धक्का देण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.  आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्यानं चर्चेला उधाण आले आहे.  काल रात्री उशिरा अजित पवार कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात श्री सेवकांची विचारपूस करण्यासाठी गेले होते. तिथून पुण्याला न जाता अजितदादा आपल्या मुंबईतल्या निवासस्थानी गेल आहेत

अजित पवार मुंबईत देवगिरीला आहेत. उष्माघाताचा उपचार घेत असलेल्यांची भेट घेऊन ते रात्री तीन वाजता घरी पोहचले. त्यामुळे  पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याला देखील अजित पवार गेले नाहीत.  त्याआधी वडकी, दिवे, भिवरी, बनपुरी या गावांमध्ये त्यांचे  कार्यक्रम होणार होते. मात्र अजित पवारांचे आजचे वडकी, दिवे, भिवरी, बनपुरी या गावातील कार्यक्रम रद्द झाले आहेत.सासवडमधील कार्यक्रमास देखील ते उपस्थित राहण्याची शक्यता नाही.  अजित पवारांच्या अनुपस्थितीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. अजित पवार अद्यापही मुंबईत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

असा होता अजित पवारांचा पुणे दौरा?

  • सकाळी 9.30 वाजता-  जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन- अविनाश कैलास मोडक, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस वडकी व शिलाताई अविनाश मोडक
  • सकाळी 9.45 वाजता-  उपसरपंच, वडकी दिवे (श्री कातोबा हायस्कूल) येथे आगमन स्वागत पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी दिवे येथून मोटार सायकल रॅली
  • सकाळी 10.15 वाजता- मौजे वनपुरी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व नळ पाणी पुरवठा योजना भूमीपूजन
  • सकाळी 10.45  वाजता -  मौजे भिवरी, जिल्हा परिषद पुणे साठवण बंधारा (पठारवाडी) भूमिपूजन पुणे सासवड रस्ता ते पुणे सातारा हायवे (एनएच-4) जोड रस्ता पठार वाडी (भिवरी) ते गोगलवाडी मार्गे / तालुका जोड रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन,  हॉटेल आमराई 69 रिसॉर्ट उद्घाटन
  • सकाळी 11.20  वाजता- वाघीरे महाविद्यालय (राखीव) 
  • सकाळी 11.30 वाजता- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी व युवक मेळावा सासवड (पालखी तळ मैदान)
  • दुपारी 2.30 ते 3.30 - राखीव

अजित पवार भाजपात जाणार?

काही दिवसांपूर्वी अजित पवार ताफा सोडून खासगी गाडीत बसून गायब झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मी कुठेही गायब झालो नव्हतो. माझी तब्येत ठीक नव्हती, पित्ताचा त्रास झाला होता, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवारांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात आले. पहाटेच्या शपथविधीपासून ते आता पुन्हा मध्येच गायब झाल्याने चर्चा रंगली होती. त्यासोबत मोदींच्या डिग्रीसंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर अजित पवार भाजपात जाणार अशी चर्चा सुरु झाली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनीदेखील अजित पवार भाजपात जाणार असा दावा केला. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. अजित पवारांना आठवलेंनी देखील पक्षात येण्याची ऑफर दिली. यावर आता अजित पवार काय उत्तर? देतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Embed widget