Ajanta Saptakund waterfall: अजिंठा लेणी जवळील सप्तकुंड धबधब्यावर रील्स, सेल्फी काढण्यास बंदी, पर्यटकांना पोलिसांचा कडक इशारा
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात असणारा सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे, मात्र सेल्फी, रिल्स काढायला जाल तर कारवाई करू असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Chhatrapati Sambhajinagar: जगप्रसिद्ध अजिंठा परिसरात (Ajanta caves) असलेल्या सप्तकुंड धबधब्याजवळ ( Saptakund waterfall) रील्स, सेल्फी व फोटोसेशन करण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या १० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले वाहू लागल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे अनेक पर्यटक या परिसरात गर्दी करताना दिसत आहेत. हा धबधबा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने या परिसरात फोटो, रिल्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला निर्णय
अजिंठा लेण्यांच्या डोंगररांगांमधील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी देशाविदेशातून पर्यटक येत असतात. परंतू याचवेळी भावनेच्या भरात उत्साही पर्यटक नको ते धाडस करतात आणि संकटाला आमंत्रण देतात. यापूर्वी अशा धोकादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सप्तकुंड धबधब्याजवळ फोटोसेशन, सेल्फी, रिल्स काढण्यासाठी मज्जाव केला आहे. धबधब्यावर फोटो, रिल्स काढण्यासाठी जाल तर कारवाई करण्याचा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे..
सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहतोय...
अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये असलेला सप्तकुंड धबधबा रविवारी झालेल्या पावसाने ओसंडून वाहू लागला आहे. पावसाळ्यात या भागाचे निसर्गरम्य रूप पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं आपोआप या धबधब्याकडे वळतात. या लेणीपरिसरात नैसर्गिकरित्या सात कुंडांसारखी रचना तयार झाली त्यामुळे या धबधब्याला सप्तकुंड धबधबा म्हटले जाऊ लागले.
हेही वाचा:
Maharashtra Weather : मराठवाड्यासह विदर्भाला पावसानं झोडपलं, मुसळधार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप