एक्स्प्लोर

क्या बात! 'या' गावच्या ग्रामपंचायतीवर 55 वर्षे एकाच कुटुंबातील सरपंच

या गावाला आत्तापर्यंत संत तुकाराम, वनग्राम, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, आदर्शगाव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि पाहतापाहता गावगाड्यात किमया करणाऱ्या अनेकांच्याच नावांची चर्चा झाली. यातच एक असं कुटुंबही प्रकाशझोतात आलं, ज्यानं ग्रामपंचायत निवडणूक गाजवण्याचा जणू विक्रमच केला.

अहमदनगर येथील लोहसर गावात एकाच कुटुंबाने आपल्याच घरात 55 वर्ष ग्रामपंचायची सत्ता राखण्यात यश मिळावलं आहे. मागील 55 वर्षांपासून ग्रामपंचायतीची सत्ता येथील गीते कुटुंबाकडे आहे. यंदाच्या वर्षी हिरा गीते सरपंच झाल्या असून, यापूर्वी त्यांचे पती अनिल गीते, सासरे जगन्नाथ गीते आणि अजेसासरे केशवराव गीते यांनी गावाचं सरपंचपद भुषवलं होतं.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले लोहसर हे गाव. या गावाला आत्तापर्यंत संत तुकाराम, वनग्राम, गाडगेबाबा स्वच्छता अभियान, आदर्शगाव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. लोहसर गावात ग्रामपंचायतीच्या एकूण 9 जागा होत्या. अनिल गीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भैरवनाथ ग्रामविकास मंडळाने 9 पैकी 5 जागा जिंकून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली. यंदाच्या वर्षी हिरा गीते यांना सरपंच पद मिळाल्याने संपूर्ण गावाने आनंद उत्सव साजरा केला. आदर्श गाव म्हणूनही या लोहसरची ओळख आहे.

सांगलीतील कवठेपिरान गावात कमाल, पत्नी सरपंच तर पती उपसरपंच पदावर बिनविरोध!

माजी सरपंच असलेले अनिल गीते यांच्या पत्नी हिरा गीते यांची सरपंच पदी निवड करण्यात आली. हिरा अनिल गिते या लोहसरच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्या आहेत. गावकऱ्यांनी आमच्या कुटुंबावर टाकलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही असा विश्वास गीते दाम्पत्यानं व्यक्त केला. इतकंच नाही तर रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत गोष्टींसोबतच दारूबंदी करून गावाचा सर्वाधिक विकास करून गावचे नाव देशाच्या नकाशावर घेऊन जाऊ असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच हिरा गीते आणि माजी सरपंच अनिल गीते पाटील यांनी व्यक्त केला.

परंपरा, प्रतिष्ठा आणि....

अनिल गीते यांचे आजोबा केशवराव गीते पाटील यांनी सुरुवातीला 25 वर्ष गावात सरपंच म्हणून काम पाहिलं. त्यानंतर अनिल गीते यांचे वडील जगन्नाथ गीते हे 15 वर्ष सरपंच होते. आजोबा केशवराव गीते आणि वडील जगन्नाथ गीते यांनी सुरुवातीला गावाचा विकास करून गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर स्वतः अनिल गीते आणि पत्नी हिरा या दोघांनी 15 वर्षे सरपंचपद भूषवलं. या काळात गावातील समस्या दूर करून गावाला अनेक विकासकामांतून पुरस्कार मिळवून दिले. हिरा गीते यांनी सरपंच असताना महिलांच्या समस्या सोडवल्या. तसंच बचत गट, महिला सक्षमीकरण यातून गावातील महिलांना एकत्र करून रोजगार देखील उपलब्ध करून दिला. त्यामुळे लोहसर ग्रामस्थांनी पुन्हा गावाचा कारभार गीते कुटुंबियांना दिला.

क्या बात! 'या' गावच्या ग्रामपंचायतीवर 55 वर्षे एकाच कुटुंबातील सरपंच

Gram Panchayat Election Results | फॉरेन रिटर्न पीएचडीधारक महिलेच्या नेतृत्त्वात ग्रामपंचायत निवडणूक, 9 पैकी 8 जागांवर विजय

यंदाच्या वर्षी अनिल गीते यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भैरवनाथ ग्रामविकास मंडळाने ग्रामपंचायत निवडणुकीत 9 पैकी 5 जागा जिंकून पुन्हा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच 55 वर्षे ग्रामपंचायत सरपंच होण्याचा बहुमान गीते कुटुंबीयांनी मिळवला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget